शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांचे स्वयंस्फूर्तीने ज्ञानदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:08 IST

ऑनलाइन शिक्षणाला पर्याय : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मोबदला न घेता अध्यापन

जव्हार : कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्षात अद्यापपर्र्यंत शाळा बंदच आहेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडा मोबाईल घेऊन आॅनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून माजी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे. अनलॉक लर्निंगवर पर्याय म्हणून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कुठलाही मोबदला न घेता माजी विद्यार्थी स्वयंस्फूर्तींने शिक्षण देत असून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कुठल्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचेही शिक्षण सुरू राहावे म्हणून काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावपाड्यांत जाऊन इयत्तेनुसार शिक्षण दिले जात आहे. शिक्षण देताना गावातील मुलांची इयत्तेनुसार यादी तयार करून एखाद्या अंगणात, मोकळ्या जागेत बसून, कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवून शिक्षण दिले जात आहे. रोज संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत इयत्ता ५ वी ते ८ वी आणि रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत, इयता ८ वी. ते १० वी पर्यंत असे शिक्षण दिले जात आहे. तसेच आश्रमशाळेतील शिक्षक दिवसाआड शिक्षण देत असलेल्या ठिकाणी भेटी देतात. दरम्यान, त्यांना खडू, पेन्सिल, वह्या, पुस्तके असे साहित्य शिक्षक उपलब्ध करून देतात. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना गावातील लोकांकडून आणि त्या आश्रमशाळेतील शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे.आम्ही त्या आश्रमशाळेत शिक्षण घेतले आहे. माजी विद्यार्थी म्हणून स्वयंस्फूर्तीने मुलांना शिकवतो. आमची कुठल्याही प्रकरणाची मोबदल्याची अपेक्षा नाही. त्या शाळेने आम्हाला शिक्षण दिले म्हणून आमच्या गावातील मुलांना आम्ही शिक्षण देतो. त्यात आमचाही सराव होतो.- विजय भरसट,माजी विद्यार्थी, बीएससी, बीएड

टॅग्स :thaneठाणे