शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माहेरवाशिणीसह बाप्पांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 11, 2016 02:08 IST

पालघर जिल्ह्यामध्ये शनिवारी गौरी सह गणपती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह गुलालच्या उधळणीने

पालघर जिल्ह्यामध्ये शनिवारी गौरी सह गणपती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह गुलालच्या उधळणीने सर्व परिसर दणाणून गेला होता. माहेरवाशीण गौरी सोबत बाप्पाच्या जाण्याने अनेक भक्तांना आपले आश्रू अनावर झाले होते. स्थापने पासून घरोघरी मोठी लगबग सुरु होती. कुठे गोडधोड पदार्थ तर कुठे झिम्मा फुगडीची सलामी असे भारलेले वातावरण होते. बोल बोलता हे सहा दिवस कसे निघुन गेले ते कळलेच नाही. विसर्जनाच्या क्षणी भक्तांनी डोळ्यात प्राण आणून बाप्पांना लवकर येण्याचा निरोप दिला.वसई : वसई तालूक्यातील सहा दिवसांच्या गणेशमूर्तीचे शनिवारी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांनी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. वसई-विरार अग्निशमन दल, आपत्कालिन पथक व महापालिकेनेही गणेश विर्सजनासाठी चोख तयारी केलीली दिसून येत होती. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता. वसईतील अर्नाळा परिसरात समुद्रकिनाऱ्यावर जिवरक्षक बचाव पथके तैनात करण्यात आली होती.तसेच समुद्रकिनारीही घरगुती व सार्वजनिक मंडळांचे विसर्जन करण्यात आले. वसईत अनेक ठिकाणी श्रीगणेशासोबत गौराईलाही निरोप देण्यात आला. सहा दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने शनिवारी निरोप घेतला. दुपारनंतर वसई तालूक्यातील अनेक तलावांवर, तालुक्यातील खाडीकिनारी व विसर्जनस्थळी गणपती बाप्पा मोरयाच्या,पुढल्या वर्षी लवकर या..! जयघोषात गौरी -गणपतींच्या मिरवणुका दाखल होणे सुरू झाले होते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वसईत विसर्जनस्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.सहा दिवसांनी बाप्पांला निरोप देताना भक्तांना गहीवरून आले होते. अखेर शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे आग्रहाचे निमंत्रण देऊन साश्रुनयनानी बाप्पांना निरोप देण्यात आला.