शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदारकीसाठी कितीही करा खर्च

By admin | Updated: January 25, 2017 04:30 IST

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे कोणतेही बंधन घातलेले नाही.

सुरेश लोखंडे / ठाणे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे कोणतेही बंधन घातलेले नाही. मात्र विविध स्वरूपाच्या मर्यादा आयोगाने घालून दिल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करायचा असेल, तर मात्र उमेदवारांना रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.या निवडणुकीसाठी विविध पक्ष-आघाडीचे दहा उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात या मतदारसंघांचा अवाढव्य पसारा आहे. यातील सर्व उमेदवार आर्थिकदृट्या सबळ आहेत. मतदारसंघाचा आकार पाहता उमेदवारांचा सर्वाधिक भर सोशल मीडियावर असेल. उमेदवारांच्या सभा, बैठका नियमित सुरू आहेत. पण मात्र सोशल मीडियावरील प्रचारसाहित्य, लिखाण, त्यातील मुद्दयांची तपासणी करून घेण्याची सक्ती उमेदवारांना करण्यात आली आहे. त्यासाठी पाचही जिल्ह्यात मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅन्ड मॉनिटेरिंग कमिटी (एमसीएमसी) स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ती काम करेल. फेसबुकवरील अकाऊंट ओपन करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करण्यासाठीही उमेदवाराला या कमिटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. टीव्ही चॅनेल, केबल नेटवर्क खाजगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणचे आॅडिओ-व्हिज्युअल डिस्प्ले, सोशल मीडिया, एमएमएस, व्हॉईस मेसेज आदींवर करण्यात येणाऱ्या प्रचाराचे मुद्दे, जाहिराती प्रथम तपासून घेण्याची सक्ती उमेदवारांवर आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे बंधन मात्र उमेदवारावर नाही.