शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 17:02 IST

बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देबालमहोत्सवात बालकलाकारांची धम्मालरवी पटवर्धन यांचा विशेष सत्कारराजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार

ठाणे : लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांनी केलेले सुत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, पारितोषिक सोहळ््याने रविवारचा बालमहोत्सव हसत खेळत आणि उत्साहात रंगला. यावेळी बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणाºया ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना पटवर्धन यांनी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.            प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि भूमी वर्ल्ड यांच्यावतीने रविवारी गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुरूवातीला बालकलाकारांचे सादरीकरण झाले. त्यानंतर बालरंगभूमीसाठी सातत्याने योगदान देणाºया राजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नरेश म्हस्के म्हणाले की, भावी पिढीला संस्कार देण्याचे काम ही मंचावरील सगळी मंडळी नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत, म्हणूनच ती पुरस्काराला पात्र आहेत. अशा मंडळींचे कौतुक करणे हेच आमचे काम आहे. देशाचे नागरिक बनत असताना मुलांना घडविण्याचे काम हे मान्यवर करीत आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तुलालवार म्हणाले की, बालक्षेत्रात काम करणाºया शहरात ठाणे अव्वल आहे, सवार्धिक नाट्यसंस्था, वर्षाला सर्वाधीक नाट्यप्रयोग याच शहरात आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अणखीन वाढली आहे. अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी बालकलाकारांना जशी शिस्त असते तशी बालप्रेक्षकांनाही असावी आणि याची जबाबदारी पालकांची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई दुरदर्शनचे जयू भाटकर यांची विशेष उपस्थिती होती. स्टँडअप कॉमेडीयन अमोल सोनी यांनी लहान मुलांसाठी आकर्षक खेळ घेऊन त्यांचे मनोरंजन केले. मुलांनी झिंगाट, बाला अशा विविध गाण्यांवर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या पाल्याबरोबर वडिलांनी सहभागी होण्याच्या खेळाने तर प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. विशेष म्हणजे मुलांनी काढलेल्या चित्रांनी रंगमंच सजविण्यात आला होता तर मुलांनी बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन रंगमंचासमोर मांडले होते. सिंधुदुर्गच्या चेतन गंगावणे यांनी सादर केलेले कळसुत्री नाटक हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक