शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ठाणेकरांना पालिका करणार कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 02:31 IST

ठाणे महापालिकेने आता डिजिटल अर्थात, डीजी ठाणे ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार, या संकल्पनेशी जोडल्या जाणाऱ्या ठाणेकरांना स्मार्टकार्डप्रमाणे कार्ड

ठाणे : ठाणे महापालिकेने आता डिजिटल अर्थात, डीजी ठाणे ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार, या संकल्पनेशी जोडल्या जाणाऱ्या ठाणेकरांना स्मार्टकार्डप्रमाणे कार्ड दिले जाणार आहे. या कार्डद्वारे पालिकेची विविध बिले, सिनेमा तिकिटे, शॉपिंग, हॉस्पिटल, नव्या योजना, सामाजिक आशयांच्या कामांसह इतर सेवा मिळणार आहेत. हे कार्ड एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणे काम करणार आहे, तसेच या माध्यमातून एक अ‍ॅपही पालिका तयार करणार असून, त्याद्वारे शहरातील वाहतूककोंडी, बससेवा आदींसह इतर सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणार आहे.इस्रायलमधील तेल अवीव महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका ही संकल्पना राबवत असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. ठाणेकरांना ठाणेकरांशी, महापालिकेशी आणि खासगी संस्थांशी या माध्यमातून जोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. स्मार्टकार्डप्रमाणे ही सुविधा असल्यामुळे त्यासाठी एचडीएफसी बँकेशी टायअप केले आहे. ते डेबिट कार्डप्रमाणेही वापरता येणार आहे. इतर बँकांनाही यात सामील करून घेतले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार असून, शॉपिंग करता येणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात बँकेचे व्यवहार सुरू करण्यात येऊन पालिकेचा मालमत्ताकर, पाणीबिल एका स्वॅपवर भरण्याची संधी मिळणार आहे.यात वैयक्तिक डेटाही उपलब्ध होणार असल्याने व्यक्तीला कशाची आवड आहे, त्याला काय आवडते, याची सर्व माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात व्यक्ती राहत असेल, त्या भागात त्याच्या आवडीच्या कार्यक्रमांची माहिती त्याला मेल, मेसेजच्या माध्यमातून दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)