शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जांभळीच्या ४०० भाजी विक्रेत्यांचे सेंट्रल मैदानात होणार स्थलांतर * बुधवार पासून सुरु होणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 13:57 IST

ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. जांभळी नाक्यावरील भाजी मंडईची ...

ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. जांभळी नाक्यावरील भाजी मंडईची गर्दी टाळण्यासाठी आता येथील ४०० भाजी विक्रेते,फ ळ विक्रेते आदींचे आता सेंट्रल मैदानात स्थलांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बुधवार पासून या ठिकाणी त्यांना आपला व्यावसाय करता येणार आहे. पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंतच हे मार्केट सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. याठिकाणी सोशल डिस्टेंट राखला जाणार आहे.                  जांभळी नाका ते स्टेशन पर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत होणारी गर्दी ही रोजचीच झाली आहे. नागरीकांना कितीही सोशल डिस्टेंट पाळा असे आवाहन करण्यात आले असले तरी आणि गर्दी करु नका असे सांगण्यात आले असले तरी नागरीक काही ऐकत नसल्याचेच दिसत होते. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी येथील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यापाऱ्यांबरोबर महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला, ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरिक्षक सोमवंशी आदींची एक बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा उपाय पुढे येथील सर्व भाजी विक्रेत्यांचे तात्पुरत्या स्वरुपात सेंट्रल मैदान येथे स्थलांतर करंण्यावर एकमत झाले. त्यानुसार आता येत्या बुधवार पासून सेंट्रल मैदानात ४०० भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर व्यापारी आपल्या व्यावसाय करणार आहेत. त्यानुसार आता त्याठिकाणी मार्कींगचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तर याठिकाणचे दोन रस्तेही सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून बंद करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.सेंट्रल मैदानात सोशल डिस्टेंटचे पालन केले जाणार असून ४०० विक्रेते आता बुधवार पासून आपला व्यावसाय करणार आहेत. पहाटे पाच ते १० या वेळेतच या ठिकाणी व्यावसाय करता येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील या ठिकाणी सोशल डिस्टेंट ठेवून गर्दी करु नये असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMarketबाजार