शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या विज्ञान प्रदर्शनात ७४ प्रकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:52 IST

विविध ठिकाणच्या शाळांचा सहभाग; प्रत्युष सोनावणे, आदित्य घोरड याने पटकावला प्रथम क्रमांक

बदलापूर : आदर्श विद्यामंदिर आणि द यंग सायंटिस्ट डेन, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यामंदिरात रविवारी विज्ञान प्रकल्प स्पर्धा प्रदर्शन पार पडले. या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक रात्र विद्यालयाच्या प्रत्युष सोनावणे आणि कार्मेलच्या कॉन्व्हेंट स्कूलच्या आदित्य घोरड याने पटकावला. द्वितीय क्र मांक कार्मेल कॉंन्व्हेंटच्या सानिका जाधव तर तृतीय क्र मांक इनरव्हील शाळेच्या देवेंद्र भूषण कुलकर्णी, आर्यन मयेकर यांनी पटकावला. खुल्या गटात वसारच्या जिल्हा परिषद शाळेच्या मोहिनी पंडित बागुल यांनी बाजी मारली. या प्रदर्शनात एकूण ७४ प्रकल्प मांडण्यात आले.रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत आदर्श विद्यामंदिर शाळेच्या संकुलात ही स्पर्धा पार पडली. या प्रदर्शनाचे उद्घाटन विख्यात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथील खगोल भौतिकीमधील तरुण संशोधक प्रितेश रणदिवे आणि आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात चार तालुक्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.आदर्श विद्या प्रसारक संस्था यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकी विषयातील ७४ विविध प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनात बदलापूर शहरी आणि ग्रामीण भागासह अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तसेच भिवंडी तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. तसेच यावर्षी महाविद्यालय गट आणि खुला गटाचाही समावेश केला होता.परीक्षक म्हणून घरडा केमिकल्सचे मुख्य संशोधक प्रीतेश रणदिवे, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संशोधक डॉ. दीपक नळदकर , प्रशांत जोशी, भूवैज्ञानिक प्रणित देशमुख आणि पुण्यातील डॉ. वृषाल केळकर यांनी काम पाहिले. मोठ्या गटात प्रथम क्र मांक रात्र विद्यालयाच्या प्रत्युष सोनावणे आाणि कार्मेलच्या कॉन्व्हेंट स्कूलच्या आदित्य घोरड याने पटकावला. द्वितीयक्रमांक कार्मेल कॉन्व्हेंटच्या सानिका जाधव तर तृतीय क्र मांक इनरव्हील शाळेच्या देवेंद्र कुलकर्णी, आर्यन मयेकर यांनी पटकावला. खुल्या गटात वसारच्या जिल्हा परिषद शाळेच्या मोहिनी पंडित बागुल यांनी बाजी मारली. कार्यक्र मासाठी आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी देशपांडे व सहकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.छोट्या गटातून वेद घोसाळकर अव्वलप्रकल्पासाठी छोट्या गटातून प्रथम क्र मांक जी. आर. पाटील विद्यालयाच्या वेद घोसाळकर आणि आरीश शेख यांनी पटकावला तर द्वितीय क्र मांक कार्मेलच्या टिया चॅटर्जी, पूर्वा प्रभुचंदेरकर, तन्मय चॅटर्जी आणि तृतीय क्र मांकही कार्मेलच्या सिद्धार्थ चक्र वर्ती या विद्यार्थ्याने पटकावला.