शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या ‘पॉज’नंतर ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार!

By admin | Updated: July 11, 2016 02:06 IST

गेले सहा महिने खंडित झालेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ पुन्हा रंगणार आहेत. सलग १३ महिने सुरू असलेला हा उपक्रम सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर नव्या जोमाने, दर्जेदार वक्त्यांच्या उपस्थितीत सुरू

ठाणे : गेले सहा महिने खंडित झालेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ पुन्हा रंगणार आहेत. सलग १३ महिने सुरू असलेला हा उपक्रम सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर नव्या जोमाने, दर्जेदार वक्त्यांच्या उपस्थितीत सुरू होत आहे. २५ आॅगस्टपासून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाउन हॉलमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर यामुळे कट्ट्याकट्ट्यांवर मारल्या जाणाऱ्या गप्पा लुप्त होत चालल्या असून प्रत्यक्षात भेटणे दुर्मीळ होत चालले आहे. या गप्पांना नवसंजीवनी मिळावी आणि सोशल मीडियाशिवाय किमान दोन तास एकत्र राहून गप्पांच्या दुनियेत रंगावे, यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘गच्चीवरच्या गप्पा’ हा आगळावेगळा उपक्रम १३ महिन्यांपूर्वी सुरू झाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून न भेटणारी मंडळी एकत्र येऊ लागली. पहिला कार्यक्रम कुलकर्णी यांच्या गच्चीवर १० ते १२ मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. आता तब्बल ३०० हून अधिक मंडळी या उपक्रमाशी जोडली गेली आहे. २५ आॅगस्टपासून हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. दरमहिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सायं. ५.३० ते ८ या वेळेत गप्पा रंगणार असून अशोक पत्की, अलका कुबल यासारखे अनेक दिग्गज वक्ते उपस्थित राहणार आहेत. सलग १३ महिने चाललेल्या या उपक्रमात सुरुवातीला ‘कोणीही कोणत्याही विषयावर बोला’ असे स्वरूप होते. त्यानंतर, वैविध्यपूर्ण आयुष्याचा आढावा घेता यावा आणि प्रेक्षकांना दर्जेदार बौद्धिक मेजवानी मिळावी, यासाठी मान्यवर मंडळींना आमंत्रित केले जाऊ लागले. या उपक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ, अभिनेते गिरीश ओक, चित्रकार सुहास बहुलकर, चित्रकार शिरीष मिठबावकर, कवी, चित्रकार आशुतोष आपटे, आकृती सॉफ्टवेअरचे जनक श्रीधर श्रीनिवास यासारख्या अनेकांंनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)