शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

भावाकडून बहिणीची लैंगिक छळवणूक

By admin | Updated: June 11, 2017 02:30 IST

बहिणीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या सख्ख्या भावाला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याशी हे चाळे करीत असल्याची

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बहिणीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या सख्ख्या भावाला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याशी हे चाळे करीत असल्याची माहिती समोर आली आहे.एकीकडे रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असतानाच किसननगर भागात एक १९ वर्षीय मुलगा त्याच्याच सख्ख्या बहिणीचा वारंवार विनयभंग करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलुंडच्या एका संगणकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये ही १७ वर्षीय मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षणाला जात होती. नेहमी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून तेथील महिला सचिवाला काहीशी शंका आल्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. ही सचिव महिला आधी तिच्या घराजवळ वास्तव्याला असल्यामुळे त्यांची तिच्याशी चांगली ओळखही होती. त्यामुळेच तिने त्यांच्याकडे अखेर आपले मन मोकळे केले. त्या वेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. घरात कोणी नसताना भाऊ तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. कधीकधी तर तो तिला मोबाइलवरील अश्लील क्लिपिंग दाखवूनही तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असे. या संपूर्ण प्रकाराची माहिती प्रशिक्षण केंद्रातील संचालक आणि सचिवांच्या मदतीने तिने श्रीनगर पोलिसांना सांगितली. याबाबत, ९ जून रोजी रात्री ९ वा. गुन्हा दाखल होताच अवघ्या तासाभरातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी त्याला अटक केली आहे. पालकांनी लक्ष द्यावेआपला मुलगा किंवा मुलगी काय करतात, त्यांच्याकडील मोबाइल आणि नेटचा ते योग्य कामासाठीच वापर करतात की नाही, याबाबत पालकांनीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. असे प्रकार होणार नाहीत, याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे