शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राबोडीतील तरुणावर गोळीबार ; आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरून मोहमद जैद मंजूर खान (३०) याच्यावर चाकूने तसेच रिव्हॉल्व्हरने हल्ला करणाऱ्या दोघांपैकी मोहन मल्लेश ...

ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरून मोहमद जैद मंजूर खान (३०) याच्यावर चाकूने तसेच रिव्हॉल्व्हरने हल्ला करणाऱ्या दोघांपैकी मोहन मल्लेश माचारला (२२, रा. गोकुळनगर, ठाणे) याला राबोडी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अटकेतील शब्बीर शेख आणि मोहन या दोघांनाही २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या खान यांच्यावर शब्बीर आणि मोहन या दोघांनी मंगळवारी दुपारी चाकूचे वार करुन तसेच रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून हल्ला केला होता. यात गोळी चुकल्याने सुदैवाने यातून ते बचावले. मंगळवारी दुपारी राबोडीतील तपासेनगर या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेल्या खान यांना मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह शब्बीरने धरला. खान यांनी त्यास विरोध केला. याच रागातून शब्बीर आणि त्याच्या साथीदाराने खान यांना मारहाण केली. त्यानंतर शब्बीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. तसेच पिस्तूल मधून एक राउंड खान यांच्या दिशेने फायर केला. मात्र, गोळी चुकल्याने खान थोडक्यात बचावले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तसेच हत्यार प्रतिबंधक कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या पथकाने अवघ्या २४ तासातच अगोदर शब्बीरला त्यापाठोपाठ मोहन माचारला ही अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल हस्तगत केले. हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

........

वाचली