शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ढोल वाजूनही शोभायात्रा निरुत्साही

By admin | Updated: March 29, 2017 05:49 IST

गेल्या अनेक दिवसांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ढोल-ताशा तडतडणार किंवा कसे यावरून सुरू असलेल्या

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ढोल-ताशा तडतडणार किंवा कसे यावरून सुरू असलेल्या वादानंतरही अखेर ढोल निनादला. मात्र अनेक निर्बंधांमुळे ढोलाचा गजर माफक स्वरुपात, मात्र उत्साही गर्दीच्या साक्षीने झाला. परंतु ठाणेकरांचा रोडावलेला सहभाग आणि चित्ररथांची मर्यादित संख्या यामुळे स्वागतयात्रेचा नेहमीचा उत्साह यंदा जाणवला नाही.पर्यावरणविषयक निर्बंध, आयोजकांचा जबाबदारी स्वीकारण्यास नकार आणि पोलिसांची अडेलतट्टू भूमिका यामुळे ढोल-ताशा पथकांचा सहभाग कमी होता. विष्णूनगर, चिंतामणी चौक आणि घंटाळी चौकात ढोलताशांचे वादन झाले. पथकांचे वादन पाहण्यासाठी ठाणेकरांनी तेथे गर्दी केली होती. राम मारुती रोडवर दरवर्षी तरुणांचा जमाव असतो. यंदा या मार्गावर अत्यल्प प्रतिसाद होता. ऊन डोक्यावर येण्याच्या आत अनेकांनी स्वागतयात्रेतून काढता पाय घेतला. बघ्यांनी तर त्यापूर्वीच घराची वाट धरली होती. मार्ग बदलल्याने स्वागतयात्रा लवकर संपली. त्यामुळे यंदा स्वागतयात्रेत मजाच आली नसल्याची कुजबूज ठाणेकरांकडून ऐकायला मिळाली. कडक उन्हामुळे सर्वच जण घामाघूम झाले होते. यात्रेत चित्ररथ मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असा आयोजकाचां दावा होता. प्रत्यक्षात चित्ररथांचा कमी सहभाग दिसून आला. त्यातही जे चित्ररथ होते त्यात नाविन्य नसल्याने ठाणेकरांचा हिरमोड झाला. स्वागतयात्रेचा मार्ग बदलल्याने विष्णूनगर येथून आलेले मोठे चित्ररथ गोखले मार्गावर जाण्याकरिता वळण घेत असताना घंटाळी चौक येथे अडखळत होते. चित्ररथ वळवताना चालकाचे कौशल्य पणाला लागत होते. (प्रतिनिधी)