शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने केले भाजपाला टार्गेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:16 IST

पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने ही यंत्रणा भाजपाच्या इशा-यावर नाचत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये भाजापा उमेदवार पैसे वाटप करत असल्याची तक्रार करूनही निवडणूक प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने ही यंत्रणा भाजपाच्या इशा-यावर नाचत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नरेंद्र मेहता यांनाही त्यांनी लक्ष्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल सत्ताधारी भाजपाला पाठिंबा दिल्यासारखे वागत असल्याने त्यांना सेनेच्या स्टाईलने धडा शिकविला जाईल, असा इशारा दिला.सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्टाचाराला मतदार कंटाळल्याचा फायदा शिवसेनेला मिळेल, असा दावा त्यांनी केला. नवघर परिसर, विनायकनगर परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप होत असल्याची करीत असल्याची तक्रार करूनही निवडणूक प्रशासन आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करणे सोडा, साधी चौकशीही न केल्याचा आरोप आमदारांनी केला. पोलीस आणि निवडणूक अधिकाºयांवर भाजपा मंत्र्यांचा दबाव आहे. या घटनेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर होते. ते पाहता शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नवघर पोलीस ठाण्यात तळ ठोकूनही पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही, असे सांगत सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. गुन्हेगारांना पाठीशी घालणाºया अधिकाºयांना शिवसेना सोडणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी बागल यांना सेनेच्या स्टाईलने धडा शिकविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.भाजपाच्या स्थानिक आमदाराने भ्रष्टाचाराचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला असून त्यांनी सरकारी महसूल बुडविल्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे आ. बच्चू कडू यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. त्यावर सरकारने साधी चर्चाही केली नाही, असे सांगत त्यांनी आमदार मेहता यांच्यावरही टीका केली. आमदार मेहता यांचे जुने व नवीन घोटाळे शिवसेना बाहेर काढणार असा इशाराही सरनाईकाांनी दिला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, पदाधिकारी अरुण कदम उपस्थित होते.>खा. विचारे यांनीही भाजपा मतदारांना पैशांचे वाटप करीत असून मतदानासाठी धमकावत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्याचा विकासाचा मुद्दा खोडून काढत त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील ६५०० कोटी आणि ठाणे महापालिका निवडणुकीतील ३६०० कोटींचा निधी विकासकामांसाठी देण्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.