शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेविका आणि पतीवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: March 9, 2017 16:34 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने

 ऑनलाइन लोकमतकल्याण, दि. 9 -  कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री 12 च्या सुमारास कल्याण पूर्वेत हा प्रकार घडला असून, सेना नगरसेविका माधुरी काळे यांनी सेनेच्याच पदाधिकाऱ्याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

माधुरी आणि प्रशांत काळे हे काल रात्री घरी चालले असताना बाईकवरून आलेल्या काही व्यक्तींनी हे दोघेही घराजवळ पोहोचताच त्यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने सुमारे 8 ते 10 जणांनी प्रशांत काळे यांना अचानक मारायला सुरुवात केली. त्यात प्रशांत यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे माधुरी काळे यांनी सांगितले.  सध्या प्रशांत काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान कल्याण पूर्वेतीलच शिवसेना पदाधिकारी संजय गायकवाड आणि संजय मोरे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप काळेंनी केला आहे. तर ही घटना घडली त्यावेळी आपण आपल्या घरात होतो. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. याबाबत कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.