शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकाकडूनच तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यांच्या ...

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या माजी नगरसेवकानेच तिलांजली दिल्याचे चित्र शनिवारी कल्याणमध्ये पाहायला मिळाले. ५० जणांच्याच उपस्थितीला परवानगी असताना माजी नगरसेवक सुनील वायले आणि माजी नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी दोन लग्नसोहळे होते. यात सोशल डिस्टन्स, मास्क लावणे या नियमांचेही उल्लंघन झाले. दरम्यान, याप्रकरणी वधुपिता वायले यांच्यासह अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि भवानी मॅरेज हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. मनपा क्षेत्रात त्यांना रुग्णालयात बेडही मिळणे मुश्कील बनले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन कोरोना नियमांचे पालन करा, असे नागरिकांना सांगत आहेत. मात्र नियम पाळले जात नसल्यामुळे दोन्ही शहरांमधील स्थिती भयावह हाेत आहे. नागरिकांसह आता नगरसेवकही नियमांना तिलांजली देत असून शनिवारच्या लग्नसोहळ्यातून हे समोर आले आहे. यातील एक लग्नसोहळा माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा होता. याप्रकरणी त्यांच्यासह तेथे पार पडलेल्या अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग अशा तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग

मोकळ्या जागा, लॉन्स, विनावातानुकूलित हॉल या ठिकाणी ५० व्यक्तींनाच हजर राहता येईल, असा नियम असताना पश्चिमेतील काळा (भगवा) तलाव परिसरातील भवानी मॅरेज हॉलमध्ये एकत्रित पार पडलेल्या दोन लग्नसोहळ्यांना तब्बल ९०० ते १०००च्या आसपास पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गस्तीदरम्यान आढळले. यात बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते की सोशल डिस्टन्सिंगही नव्हते.