शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रप्रेमात शिंदे झाले धृतराष्ट्र

By admin | Updated: May 28, 2017 03:15 IST

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विनंतीवरून विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक अशा स्कायवॉकला मंजुरी दिली होती. त्या कामाचे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विनंतीवरून विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक अशा स्कायवॉकला मंजुरी दिली होती. त्या कामाचे भूमिपूजनही २०१४ मध्ये झाले होते, असा दावा करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या पुलाच्या कामाचे श्रेय आपल्या मुलाला मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा भूमिपूजनाचा घाट घातला असल्याकडे लक्ष वेधले. पुत्रप्रेमापोटी पालकमंत्री धृतराष्ट्र झाल्याची टीकाही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ यामधील लोकांच्या लग्नात नाचणाऱ्या अनोळखी अब्दुल्लासारखी पालकमंत्र्यांची अवस्था आहे, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात एक तरी ठळक काम केले असेल तर ते दाखवावे, असे आव्हान आव्हाडांनी शिंदे यांना दिले. केवळ श्रेय घेण्याचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.२५ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत आणि आपल्या हस्ते या स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षे विविध प्रकारच्या मंजुऱ्या घेण्यासाठी आपणच पाठपुरावा केला आहे. आता १ महिन्यापूर्वी या कामाचे कार्यादेश काढण्यात आल्यानंतर आपण केलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेत आहेत, असे आव्हाड म्हणाले. भिवंडी, मालेगाव पालिकांमध्ये भाजपा-सेनेची पिछेहाट होताच आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. - रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते विटावा स्कायवॉकसह तब्बल ४० कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. स्कायवॉक आपण मार्गी लावलेला असतानाही पालकमंत्री श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आव्हाड म्हणाले.स्कायवॉक उभारण्यामागे विटावा भागातील नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका करणे, हा उद्देश होता. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एमएमआरडीएच्या स्तरावर आपण पाठपुरावा केला होता, असे आव्हाड म्हणाले.