शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारंगी नदीच्या संवर्धनासाठी शहापूरकर एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

शहापूर : भारंगी नदीच्या संवर्धनासाठी शहापूरकर एकवटले असून रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश कुंदर यांनी २५ हजार आणि शिवसेनेचे ...

शहापूर : भारंगी नदीच्या संवर्धनासाठी शहापूरकर एकवटले असून रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश कुंदर यांनी २५ हजार आणि शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी ११ हजारांची मदत दिली. शहापूरकरांनीही नदीच्या संवर्धनासाठी सहभाग दाखविला आहे.

शहापूर येथे माहुली किल्ल्याच्या पायथ्यावरून उगम पावलेली भारंगी नदी शहापूर शहराच्या सौंदर्यात भर पाडत असते. पण, गेल्या काही काळापासून घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जात असल्यामुळे नदीत गाळ साचला आहे. या नदीचे संवर्धन करून सौंदर्य राखले जावे, त्यासाठी वसुंधरा संवर्धन मंडळाच्या माध्यमातून शिंदे यांनी पुढाकार घेऊन शनिवारी एक सभा घेतली. सभेला विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. लोकसहभागातून भारंगी नदी सुशोभीकरण कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवण्यात आले. वाढते नागरिकीकरण आणि भकास बनत चाललेल्या शहापूर शहरात सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी तसेच डम्पिंग ग्राउंड नसल्याने नदीपात्रात शहापूर शहर आणि बाजूच्या ग्रामपंचायतीचे सांडपाणी सोडले जाते. कचरा टाकला जात असल्याने नदीच्या पात्राचे नाल्यात रूपांतर झाले आहे.

कुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारंगी नदीत दरवर्षी १२६ अब्ज लीटर पाणीसाठा असतो. त्यातील ६८ अब्ज लीटर पाणी वाहून जाते. जर या नदीची खोली वाढवली तर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहू शकतो. त्यामुळे भूजलपातळी वाढून शहापूर शहर व परिसरातील बोअरवेल, विहिरींना त्याचा फायदा होऊ शकतो. शहरातील व परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटू शकते.

वसुंधरा संवर्धन मंडळाचे आनंद भागवत यांनी या मोहिमेत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगून तालुक्यातील इतर धरणे आणि पाणीसाठा असलेल्या नद्यांच्या संवर्धनासाठी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेची जबाबदारी शिंदे यांनी घेतली असून पुढील काळात एक समिती नेमण्यात येणार आहे.

सभेसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, आनंद भागवत, गोविंद व्यास, संतोष शिंदे, अरुण कासार, अपर्णा खाडे, अजित आळशी, कमलेश कुंदर, सुभाष विशे, गौतम गोडे, सुमेध जाधव, अविनाश भालेराव, अजित पोतदार तसेच व्यापारी मंडळाचे प्रकाश शाह, नागरिक उपस्थित होते.