शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर नगरपंचायतीला ११ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:29 IST

पथदिव्यांसाठी खोदले रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवली नोटीस

आसनगाव : शहापूर नगरपंचायतीचे पथदिवे बसवण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र मांक १ शहापूरकडून रस्त्याचे नुकसान केल्याने शहापूर नगरपंचायतीला तातडीने दहा लाख ९२ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे.शहापूर नगरपंचायत हद्दीतील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील अंबिका माता मंदिर ते भारंगी नदीदरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूस पथदिवे टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याची डांबरी बाजूपट्टी खोदून काँक्रिट रस्त्याचे नुकसान केले आहे. त्यामध्ये खोदलेली माती भरण्यात आली आहे.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची देखभाल-दुरु स्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीआहे.त्यामुळे बाजूपट्टी पूर्ववत करण्यासाठी आणि कर्ब काढलेल्या ठिकाणी नवीन कर्ब टाकण्यासाठी येणारा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भरण्यात यावा, असे पत्र उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ शहापूर यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना पाठवून रक्कम तातडीने रकम भरण्यास सांगितले आहे.ज्या कामासाठी डांबरी बाजूपट्टी आणि काँक्रि ट रस्त्याचे पृष्ठभागाचे खोदकाम करण्यात आले आहे. नुकसान झालेला रस्ता पुनर्स्थापित करण्याबाबत ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत. नगरपंचायत ते पुन्हा व्यवस्थित करून देईल.- बी. डी. परदेशी, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत, शहापूर