शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : बांधकाम व्यावसायिक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

कल्याण : एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात टिटवाळा ...

कल्याण : एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एक आरोपी मांडा-टिटवाळ्यातील बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती उजेडात आली असून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित अल्पवयीन मुलगी सध्या मुंबईत राहते. ती आपल्या आईबरोबर टिटवाळा येथे राहत असताना तिच्या आईने व मावशीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी शरीर विक्रीच्या व्यवसायात जबरदस्तीने तिला राजी केले. याबाबत उल्हासनगर येथे राहत असलेला तृतीयपंथी ग्राहकाबरोबर संधान साधून अल्पवयीन मुलीला लॉजिंगमध्ये घेऊन जात असे. पीडितेची आई मध्यंतरी क्षयरोगाने तर मावशी कोरोनामुळे मृत पावली असून या गुन्ह्यात दोघींचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोक्सो अंतर्गत या गुन्ह्यात सात आरोपी असून यातील दोन आरोपी मयत झाले आहेत. दोघांना अटक केली आहे. अन्य आरोपी फरार आहेत. आई आणि मावशी मयत झाल्याने अल्पवयीन मुलगी स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आली. याबाबत तिने घडलेली हकीकत व लैंगिक अत्याचाराची माहिती त्यांना दिली. मुंबईतील विक्राेळी पार्कसाइट पोलीस ठाण्यात याबाबत समाजसेविकेने तक्रार केली असता ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग करण्यात आली. टिटवाळा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.