शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन सिलिंडरच्या सेवेमुळे शेकडो रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ‘ऑक्सिजन देता का कुणी ऑक्सिजन,’ अशी म्हणण्याची वेळ सध्या ठिकठिकाणच्या कोरोना रुग्णांवर ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ‘ऑक्सिजन देता का कुणी ऑक्सिजन,’ अशी म्हणण्याची वेळ सध्या ठिकठिकाणच्या कोरोना रुग्णांवर आली आहे. मात्र, तुकारामनगर प्रभागाचे माजी नगरसेवक नितीन पाटील हे वर्षभरापासून कोरोना रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन पुरवत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे आतापर्यंत शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. पाटील यांनी भविष्यातील संकटाचा वेध घेत एप्रिल २०२० मध्ये २० ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. या सिलिंडरद्वारे त्यांनी वर्षभरात शहरातील शेकडो रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडरची सेवा पुरवली आहे. पाटील यांनी आधी केवळ त्यांच्या प्रभागापुरती ही सेवा सुरू केली होती. मात्र, हळूहळू आजूबाजूच्या परिसरात आणि आता शहरभर या उपक्रमाची व्याप्ती वाढली आहे. पाटील यांच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, अन्य आवश्यक कागदपत्र सादर केल्यावर उपलब्धतेनुसार सिलिंडर दिले जात आहेत. ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात झाली की तातडीने ते सिलिंडर परत करण्याचे आवाहन त्यांच्यातर्फे रुग्णांना नातेवाइकांना केले जात आहे.

पाटील म्हणाले, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरला खूप मागणी होती. त्यानंतर त्यात घट झाली. मात्र, महिनाभरापासून पुन्हा मागणी वाढली आहे. सध्या ऑक्सिजन सिलिंडरसाठी अनेक जण वेटिंगवर आहेत. आणखी सिलिंडर विकत घेण्याची तयारी आहे. मात्र, सध्या ऑक्सिजनच्या रिफिलिंगची समस्या मोठी आहे. वर्षभर मला माझ्या निकटवर्तीयांनी हे सिलिंडर रिफिल करून आणण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यासाठी रोज सुमारे १० हजारांचा खर्च येत आहे. मध्यंतरी रुग्ण घटले तेव्हा अनेकांनी ही विनामूल्य सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. परंतु, रुग्णांची गरज ओळखून ही सेवा सुरूच ठेवली. आतापर्यंत शेकडो रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे.

दरम्यान, शहरातील सामाजिक संस्था, राजकीय मंडळींनी पाटील यांच्याप्रमाणे पुढाकार घेतल्यास कोरोना रुग्णांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एका रिफिलिंगसाठी ५०० रुपये खर्च

* प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ते ऑक्सिजन सिलिंडर पुरवत आहेत. या सेवेसाठी ते राजकीय शिफारस स्वीकारत नाहीत.

* प्रभागातील नागरिकांसाठी एक सिलिंडर राखीव ठेवून ते उर्वरित सिलिंडर शहरात पुरवत आहेत.

* रिफिलिंगचे ५०० रुपये प्रति सिलिंडर, तर प्रत्येक रुग्णाला नवीन ऑक्सिजन मास्कसाठीचा १२० ते १५० रुपयांचा खर्च पाटील करत आहेत.

-----------