शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील

By admin | Updated: September 12, 2016 03:08 IST

बदलापूरच्या विकासासाठी जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने युतीचा प्रस्ताव ठेवला होता

बदलापूर : बदलापूरच्या विकासासाठी जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने युतीचा प्रस्ताव ठेवला होता. या निर्णय प्रक्रियेत आपण कुठेच नव्हतो. स्थानिकांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिवसेनेने आता आपला शब्द न पाळल्याने सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे यापुढे युती करायची की नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेण्यात येईल, असे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.कुळगाव-बदलापूर पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असली तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात छुपा करारनामा करण्यात आला. त्यानुसार, भाजपाला एक सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपद देण्यात येणार होते. मात्र, उपनगराध्यक्षपद देण्यासाठी शिवसेना चालढकल करीत आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला. शिवसेनेच्या भूमिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत भाजपाने स्थानिक पातळीवरच निर्णय घेत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर सभापतीपदाचा राजीनामा देऊन विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाढलेल्या दरीसंदर्भात चर्चा सुरू असताना आमदार कथोरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाने आपली बाजू स्पष्ट केली. बदलापूरमध्ये युती करण्याच्या निर्णय प्रक्रियेत आपण सहभाग घेतला नव्हता. स्थानिक नगरसेवक आणि जिल्ह्याच्या नेत्यांनीच पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. आता शिवसेना शब्द पाळत नसल्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयही नगरसेवकांनीच घेतला आहे. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर खासदार कपिल पाटील यांची बोलणी सुरू आहे. या बोलणीत काय निर्णय होणार, याची प्रतीक्षा आम्ही करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेनेला भाजपाकडून डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. बदलापूरमध्ये अनागोंदी कारभार सुरू असेल तर आमदार म्हणून नागरिकांच्या बाजूने लढण्याची आपली तयारी आहे. नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असताना नागरिकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे, ही भूमिका भाजपाची राहील. तीन वर्षांत पालिकेत कोणती ठोस कामे झाली, याचे एकही उदाहरण बदलापूरमध्ये दिसत नाही. जी काही कामे शहरात सुरू आहेत, ती सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून सुरू आहे. आमदार म्हणून आपण राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात बदलापूरसाठी निधी आणला आहे. मात्र, त्या निधीचाही योग्य विनियोग होत नसेल तर पालिकेच्या कामकाजावर स्पष्ट नाराजी दाखवण्याचा आपला अधिकार आहे. नाट्यगृह आणि प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारने अनुदान दिलेले असतानाही तो खर्च करण्याचे कामही पालिका करत नाही. त्यामुळे नव्याने निधी घेण्यात अडचणी येत आहेत. पालिकेने जबाबदारीने कामे केली, तर शहराचा चेहरा बदलण्यास मदत होईल, असे कथोरे यांनी स्पष्ट केले. शहरात कामे न होताच बिले निघत असल्याने आपण आता पालिकेतील कामांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. ही माहिती संकलित झाल्यावर कोणती कामे झाली आणि कोणती नाही हे कळेल. शहरवासीयांवर करवाढ लादत असताना त्यांना सुविधा देण्याचे काम झालेच पाहिजे. मात्र, ते काम पालिकेमार्फत होत नसल्यानेच आपण उघडपणे विरोध करत आहोत. शेवटी, आमची नाळ ही नागरिकांच्या समस्यांसोबत जोडलेली आहे. त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.