शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला सत्तेचा लोभ!

By admin | Updated: February 13, 2017 05:06 IST

निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात

ठाणे : निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात आणि व्यासपीठावरून परस्परांची लक्तरे काढतात. मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भीती आहे; तर शिवसेनेचा सत्तेचा लोभ सुटत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कळवा-खारेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत त्यांनी भाजप-सेनेवर तोंडसुख घेतले. निवडणुकीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडल्याबद्दल पवार यांनी उपरोधिक भाषेत त्यांचे आभार मानले. शिवसेनेवर गुन्हेगारीचे आरोप करणारे मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडेच आहे, हे विसरतात. गृहमंत्री या नात्याने या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र खुर्चीची भीती असल्याने मुख्यमंत्री ते करणार नाहीत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. याचा अर्थ लोकांनी भाजपला मतदान न केल्यास मुख्यमंत्री विकास करणार नाहीत असा तर नाही ना, असा चिमटाही त्यांनी काढला. आधी मालमत्ता कर वाढवायचा आणि मग मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्यातून देणाऱ्या शिवसेनेवर पवार यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला. बलात्कार आणि खुनासारखे गंभीर आरोप असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार ठाणेकरांवर लादणाऱ्या शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. या पक्षाच्या कारभारामुळे ठाण्यातील पाण्याचे नियोजन फसले आहे. एकेकाळी अभ्यासू लोकांनी नेतृत्व केलेल्या ठाणे महापालिकेची अवस्था शिवसेनेने बकाल केली. गेल्या २0 वर्षांमध्ये एकही मोठा प्रकल्प शिवसेना पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे बाजुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पवार यांनी ठाणे महापालिकेची तुलना नवी मुंबईशी केली. नवी मुंबई महापालिकेने तेथील रहिवाशांवर कोणतीही करवाढ लादली नाही. नवी मुंबई महापालिकेच्या शहर बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७५ टक्के प्रवास सवलत दिली जाते. ठाणे महापालिका मात्र जुनी असूनही केवळ ५0 टक्केच सवलत देते. ठाणे महापालिकेने लोकांवर अलिकडेच करवाढ लादली. आता निवडणुकीत लोकांसमोर जायला तोंड नसल्याने शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्याच्या माध्यमातून दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचारही पवार यांनी यावेळी घेतला. नोटाबंदीने असंख्य सामान्यांचे संसार उद््ध्वस्त केले. मालेगाव, भिवंडीतील हजारो कामगार घरी बसल्याचा आरोप त्यांनी केला. सभेच्या सुरूवातीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना पक्षाच्या विकासकामांचा आढावा घेतला. कळवा परिसरातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे नेते गणेश नाईक यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, मनोहर साळवी यांच्यासह इतर नेते आणि महापालिका निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)