शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

इच्छुकांची झाली शिवसेनेमध्ये भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:06 IST

अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पण पालिकेत आमचीच सत्ता येणार

धीरज परब। लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पण पालिकेत आमचीच सत्ता येणार असा दावा करणाऱ्या भाजपाकडून केवळ २५२ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आणि त्यापैकी २५ जणांनी भरून दिले आहेत. शिवसेनेकडून ५४० इच्छुकांनी अर्ज नेले असून २१० जणांनी भरून दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी असल्याचे दिसत आहे.शिवसेना, भाजपाकडून उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू झाले आहे. भाजपाच्या अर्जाची किमत तीन हजार; तर शिवसेनेची पाच हजार आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यालयात अर्ज नेण्यासाटी इच्छुकांची झुंबड उडाली. देशात भाजपाला मिळालेले यश पाहता पालिकेतही आमची सत्ता येईल, असा दावा केला जात आहे. ७० जागा जिंकू असा विश्वासही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र अर्ज नेणाऱ्यांची संख्या पाहता भाजपाला निवडणूक सोपी राहिलेली नाही. त्यांच्यात गटबाजी मोठी आहे. मेहतांनी विश्वासातील काहींना परस्पर प्रचाराला लागण्याच्या सूचना दिल्याने बंडाळी वाढण्याची चिन्हे आहेत. उलट शिवसेनेकडून अर्ज नेणाऱ्या इच्छुकांची संख्या भाजपापेक्षा दुप्पट आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचा शिवसेनेतील प्रवेश आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे, अरूण कदम यांचे टीमवर्क दिसू लागल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.मीरा-भाईंदरमधील भाजपाचे सर्वेसर्वा आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी बळावते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या माणसांकरवी तेथील घडामोडींवर वॉच ठेवला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांना तेथे पाठवले. पण मूळात अनेक कारणांनी, कार्यपद्धतीने मेहता सतत वादग्रस्त बनत आहेत. समाजातील अनेक घटकांचा रोष त्यांनी ओढावून घेतला आहे. त्यामुळे तेथील इच्छुकांचा ओढा कमी झाल्याचे मानले जाते. भाजपाने अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस उद्याचा म्हणजे गुरूवार ठेवला असून शिवसेनेने शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू होतील. ही पालिका निवडणूक मेहता आणि सरनाईक यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाची असल्याने दोघांनीही कंबर कसली आहे. भाजपाकडून महापौर गीता जैन, गटनेते शरद पाटील, डिम्पल मेहता, नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास, प्रभात पाटील, सुरेश खंडेलवाल, अनिल भोसले यांनी अर्ज नेले आहेत. प्रभाग ५ मधून विद्यमान नगरसेविका मेघना रावल यांच्यासह पती दीपक यांनीही अर्ज घेतला. माजी नगरसेवक गजानन भोईर व त्यांचा मुलगा गणेश यांनी प्रभाग चारमधून इच्छुक म्हणून अर्ज घेतले. शिवाय माजी पालिका अधिकारी अजित पाटील, पदाधिकारी संदीप तलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही अर्जासाठी गर्दी केली होती. काहींनी दोन- दोन प्रभागातून लढण्याची तयारी केली आहे.वास्तविक एका इच्छुकास फक्त दोनच अर्ज देणे बंधनकारक असताना बिल्डर दिलीप पोरवाल यांचा मुलगा गौरव याला चक्क तीन अर्ज देण्यात आले. प्रभाग क्र . ६, ८ व १ मधून पोरवाल यांनी अर्ज घेतले. ही बाब आमदार नरेंद्र मेहतांच्या निदर्शनास येताच त्यांनी एक अर्ज पोरवाल यांच्याकडून परत घेण्याची सूचना जिल्हाध्यक्षांना दिली. भाजपाच्या अर्जात प्राथमिक माहिती तसेच पक्षाचे किती प्राथमिक व सक्रीय सदस्य केले त्याची यादी जोडायची आहे. पक्षात कधी पासून सक्रिय आहात, उमेदवार म्हणून तुमच्या जमेच्या बाजू काय हे भरुन द्यायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना कॅशलेस व्यव्हाराचा आग्रह धरला आहे. पण पालिका निवडणुकीसाठी पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून अर्जासाठीचे तीन हजार मात्र रोखीने घेण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल पावणे सात लाखाची रक्कम जमा झाली. त्यामुळे मोदींच्या कॅशलेस धोरणाला भाजपाकडूनच हरताळ फासला जात आहे.सेनेचे दळवी भाजपात?मीरा रोडच्या शांतीनगर प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दळवी यांनी भाजपाकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज नेला आहे. भाजपाच्या दीप्ती भट यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर मेहताही सेनेला धक्का देणार असे बोलले जात आहे. हा त्याचाच परिपाक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आॅनलाईन, नेट बँकिंगद्वारे इच्छुकांकडून अर्ज शुल्क घेण्याची प्रक्रिया व त्याची नोंद ठेवणे अवघड ठरेल म्हणून रोखीने शुल्क घेतले. पण गोळा झालेली रक्कम लगेच खात्यात जमा करण्यात येते. - यशवंत आशिनकर, कार्यालय प्रमुख.