शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलवरील मुलांसाठी स्कूल बस देणार

By admin | Updated: March 31, 2017 05:57 IST

ठाण्यातील इतर सिग्नलवरील मुलांना सिग्नल शाळेत शिकण्यासाठी आणण्यास स्कूल बसची सुविधा महापालिका उपलब्ध

ठाणे : ठाण्यातील इतर सिग्नलवरील मुलांना सिग्नल शाळेत शिकण्यासाठी आणण्यास स्कूल बसची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार असून शिक्षकांचे मानधनदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात येईल, अशी घोषणा महापौर मीनाक्षी शिंदे व पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केली. तसेच, या मुलांच्या पालकांच्या निवाऱ्यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी आयुक्तांनी सांगितले.समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पूर्व प्राथमिक वर्गासाठीचे बालमंदिर मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. एका छोट्या कंटेनरमध्ये शिकत असलेल्या या मुलांना आता बालमंदिरच्या माध्यमातून नवीन वर्ग मिळाल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे येथील तीनहातनाका सिग्नलवरील जवळपास ३० मुलांसाठी ही शाळा सुरू केली आहे. छोट्या कंटेनरमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिकमधील मुले शिकत होती. पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांना शिकवण्याच्या पद्धतीत गाणी, गोष्टी, गप्पा अशा शिक्षणपद्धतीचा समावेश असल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत असल्याची अडचण लक्षात घेऊन एका कंपनीने सिग्नल शाळेत बालमंदिरची उभारणी करून दिली आहे. महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे, जोकर गमचे संचालक प्रदीप ठक्कर, समर्थ भारत व्यासपीठाचे कार्याध्यक्ष मंगेश वाळंज, उपाध्यक्ष उल्हास कार्ले, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, नगरसेवक सुनेश जोशी, प्रा. बाळासाहेब खोल्लम, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे सतीशकुमार मुकटे यांच्या उपस्थितीत या बालमंदिरचे उद्घाटन पार पडले. (प्रतिनिधी)