शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाने मागितले होते एनओसीसाठी ५ लाख

By admin | Updated: August 31, 2016 02:55 IST

शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पालघर / नंडोरे : शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतचे वृत्त असे की, पालघरमधील रहिवासी नितांत जगन्नाथ चव्हाण यांच्या पत्नीच्या नावाने शेलावली-अंबाडी ग्रामपंचायत हद्दीत सुमारे साडेतीन एकर जागा असून ती त्यांनी व्यापारी उद्देशासाठी वापरली होती. ग्रामपंचायती कडून तसा रितसर ना हरकत दाखला ही त्यांनी त्यावेळी घेतला होता. चव्हाण यांना ही जमीन आता रहिवासी कारणासाठी वापरायची होती. यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे रहिवासी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी १२ आॅगस्ट रोजी अर्जही केला होता. २४ आॅगस्ट रोजी चव्हाण हे त्याबाबत चौकशीसाठी ग्रामपंचायतीत गेले असता सरपंच शांताराम सिताड याने व्यापारी वापराच्या दाखल्याचे रुपांतर रहिवासी दाखल्यात करून देण्यासाठी चव्हाण यांचेकडे ५ लाखांच्या लाचेची मागणी केली व त्यानुसार चार रस्ता, फाउंटन हॉटेल येथे हे पैसे घेऊन २९ आॅगस्ट रोजी बोलावले होते. चव्हाण यांनी या संबंधीची तक्रार पालघर लांचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. त्यात तथ्य आढळून येताच लांचलुचपत विभागाने सापळा लावला व सरपंचाला ५ लाखांपैकी २ लाखांची लाचेची रोकड स्वीकारताना अटक केली. आरोपी सरपंचाने पैसे घेऊन बोलावलेल्या संबंधीत ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत सापळा रचून सरपंच शांताराम सिताड यांना अटक केली. (वार्ताहर)