शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘सरसकट पास’ने विद्यार्थी खूश; पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:27 IST

अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार

- स्नेहा पावसकरठाणे  : गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत आणि यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी जाहीर केला आणि तमाम विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले. आपण पास होणार या बातमीने विद्यार्थी सुखावले; पण विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे, संपूर्ण शिक्षण त्यांना मिळत नसून ही बाब त्यांच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे हे कोरोनाचे संकट टळू दे, अशी भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता उर्वरित कुठेही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत, तर कालांतराने वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामीणमध्ये सुरू झालेली शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद केली गेली. जवळपास वर्षभर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला. मात्र, यातील अनेक अडथळे पाहता मुलांचा अभ्यासक्रम कमी केला गेला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी कमी केला. मुलांना अभ्यासाबाबत कडक सक्ती न करण्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सुचवले. एकूणच या सगळ्यामुळे मुलांना बरीच मोकळीक मिळाली आणि आता तर मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णही केेले गेले. सरकारचा हा निर्णय मुलांच्या दृष्टीने हितकारक आहे. मात्र, यामुळे काही मुले अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.आम्ही वर्षभर अभ्यास केला; पण परीक्षा घेऊन त्याचे गुण कोणत्या आधारावर देणार हे समजतच नव्हते. त्यामुळे सरसकट उत्तीर्ण करून आम्हाला आनंद झाला आहे.-रुची गोडांबे, विद्यार्थिनी, आठवीबरीच मुले अभ्यास लक्ष देऊन करत नाहीत. क्लासची वेळ कमी झाली, अभ्यासक्रम कमी झाला. यात मुलांपर्यंत परिपूर्ण अभ्यासक्रम पोहोचतच नाही. सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय अयोग्य नाही; पण मुलांना या आयत्या उत्तीर्ण होण्याची सवय लागू नये, याची भीती वाटते.    - धर्मेश पानघरे, पालककोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटतो; पण अशाने अभ्यास न करणाऱ्या मुलांनाही आयते गुण मिळतात; तर मुलांचे अभ्यासाबद्दलचे गांभीर्य कमी होऊ नये आणि त्यांनी घरी राहूनही तितक्याच चिकित्सकतेने अभ्यास केला पाहिजे. मुळात लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट टळले, तर मुलांना शाळेचे आणि शाळेतील अभ्यासाचे महत्त्व कळेल व ते कळले पाहिजे.                 - रामेश्वर नाचण, पालक