शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:31 IST

हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट

ठाणे : हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट, अशी आपली अवस्था झाली आहे. विशेषत: तरुणाई या मीडियाच्या आहारी गेलेली दिसते. मात्र, तरुणांनी प्रत्यक्ष पुस्तके वाचणे आणि त्यावर आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.आनंद विश्व गुरुकुल येथे मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे तरुणांनाही जगावेसे वाटत नाही, हे मोठे दु:ख आहे. जीवन संपवण्याची इर्षा जर जीवन जगण्यासाठी कामी आणली, तर जीवन अधिक प्रेरणादायी होईल. वाङ्मयाची गोडी लागण्यासाठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. शब्दांच्या वेगवेगळ््या छटा टिपता आल्या पाहिजे. भाषा उच्चारणातूनच आपली खरी ओळख होते. भाषा आपल्याकडून निसटणे म्हणजे एक प्रकारे जीवन निसटणे होय, असेही ते म्हणाले. सोहळ्याच्या उत्तरार्धात दवणे यांनी भाषेची आनंदयात्रा हा कार्यक्रम सादर केला. याअंतर्गत त्यांनी कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्यासह स्वत:च्याही काही कविता सादर केल्या. तसेच काही लेखकांच्या साहित्यातील उताºयांचे वाचन केले. कविता म्हणजे काय, ती कशी तयार होते, हेसुद्धा दवणे यांनी सांगितले.