शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवात ४० टनांहून अधिक विक्री

By admin | Updated: May 12, 2017 01:40 IST

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्याला ठाणेकरांनी भरभरुन प्रतिसाद देणे सुरू ठेवले आहे. विविध ठिकाणी आयोजित

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्याला ठाणेकरांनी भरभरुन प्रतिसाद देणे सुरू ठेवले आहे. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धान्य महोत्सवात आतापर्यंत ४० टनांहून अधिक धान्याची विक्री झाली, तर आर्थिक उलाढाल ५० लाखांवर गेल्याची माहिती आयोजकांनी दिली. तूरडाळ, इंद्रायणी-बासमती तांदूळ, गहू, हरभरा, उडीद, मूग या धान्याची खरेदी ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात केल्याचे त्यांनी सांगितले. नाम फाऊंडेशन आणि संस्कार संस्थेतर्फे ठाण्यात १ मे पासून धान्य महोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यातून ३५० शेतकऱ्यांचे धान्य या महोत्सवात आले असून यात तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद, चणाडाळ, मसाले, इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे २५ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी आहेत. १ मे ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदानात झालेल्या महोत्सवात २५ टन धान्याची विक्री झाली. त्यातून जवळपास १२ लाखांचे उत्पन्न मिळाले. ६ मे ते १० मे या कालावधीत पातलीपाड्यातील माझी आई शाळा येथे ९ टन धान्याची विक्री झाली आणि पाच ते सहा लाखांची उलाढाल झाली. ठाणेकरांच्या वाढत्या मागणीमुळे गावदेवी मैदानात पुन्हा धान्याचे स्टॉल लावण्यात आले. आतापर्यंत ठाणेकरांनी दिलेल्या प्रतिसादात ४० टनांच्या आसपास धान्याची उलाढाल झाल्याचे संस्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ११ व १२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तूरडाळ, ज्वारी, मसाले, तांदूळ, उडीद, कडधान्य, हळद आदींचे स्टॉल लावले जाणार आहेत.