शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेब... तर चालेल का?’ मनसेची ठाण्यात बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

ठाणे : बुधवारी ठाण्यात राणे विरुद्ध शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळाली. दुसरीकडे मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधत पाचपाखाडी येथील मुख्य ...

ठाणे : बुधवारी ठाण्यात राणे विरुद्ध शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळाली. दुसरीकडे मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधत पाचपाखाडी येथील मुख्य रस्त्यावर बॅनर लावले आहे. साहेब, राजकीय मेळाव्यात दहीहंडी फोडली व जनआशीर्वाद यात्रा किंवा पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात गणपतीची मिरवणूक काढली तर चालेल काय, असा सवाल करत मनसेने राज्य सरकारला चिमटा घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणवार काही काळ बाजूला ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाला सरकारने बंदी घातली आहे. यावर मनसेकडून राज्यसरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला जात आहे. बुधवारी ठाण्यातही याचा प्रत्यय आला. मनसेने राज्य सरकारविरोधात एक बॅनर झळकवला असून यात कोरोना असतानाही राज्यात सुरू असलेल्या राजकीय कार्यक्रमांवर टीका केली आहे. कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशारा सोमवारी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला होता. अशातच मंगळवारी ठाण्यात राणे विरुद्ध शिवसेना यात झालेल्या संघर्षावरून मनसेने ही बॅनरबाजी केली आहे. जाधव यांचे या पोस्टरवर नाव असून मनसेच्या प्रतिश मोरे यांनी हे पोस्टर लावले आहे. त्यांच्यासोबतच इतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून मनसे आक्रमक असून, दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे.