ठाणे : चक्क सहाव्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करणाºया मुंब्य्रातील एका रहिवाशासह त्याच्या आईविरुद्ध मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.जलाल नाडकर आणि नईमा नाडकर ही आरोपींची नावे असून, ते मुंब्य्रातील साबेरा अपार्टमेंटचे रहिवासी आहेत. कुर्ला येथील जुआर चाळीतील एका कुटुंबातील मुलीशी ३२ वर्षीय जलालने नोव्हेंबर २०१६ मध्ये साखरपुडा केला. कुर्ल्याच्या या कुटुंबास त्यांच्या एका परिचिताकडून हे स्थळ आले. एका नामांकित कंपनीत नोकरी आणि स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे जलालने मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले होते. मुलीच्या नावावर कार घेऊन ती भाड्याने लावण्याची बतावणी करून त्याने तीन कोरे धनादेशही घेतले होते. यादरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबीयांना जलालचे खरे रूप समजले. त्यांनी याबाबत जलालला विचारणा केली असता, त्याने ही माहिती खोटी असल्याचा दावा केला. परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी सखोल चौकशी केली असता, जलालने यापूर्वी एक-दोन नव्हे तर चक्क पाच विवाह केल्याचे समजले.
सहाव्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:37 IST