शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सागर वाघच्या परिवाराचे कुपोषण आजही सुरूच

By admin | Updated: May 23, 2017 01:28 IST

गेल्या ३० आॅगस्ट रोजी कळमवाडी येथील सागर वाघ या कुपोषित बालकाचा बळी गेल्यानंतर मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी यांनी धाव घेतली होती.

रविंद्र साळवे लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : गेल्या ३० आॅगस्ट रोजी कळमवाडी येथील सागर वाघ या कुपोषित बालकाचा बळी गेल्यानंतर मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी यांनी धाव घेतली होती. आश्वासनांची खैरात केली होती. त्यातले काहीही झालेले नसून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुंडे फाऊंडेशनतर्फे घोषित केलेली ५० हजारांची मदत आज नऊ महिने झाले तरी या परिवाराला मिळालेली नाही. त्यात सागरच्या आईने बाळाला नुकताच जन्म दिला असून ते ही कुपोषित आहे. घरात खायला दाणा नसल्यामुळे त्याला जगवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. रोजगार नाही, हाती पैसा नाही त्यामुळे मृत्यू येण्याची वाट पाहण्यापलिकडे त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.त्यामुळे आरोग्यमंत्री सावंत, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार वनगा व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ढाळलेले अश्रू मगरीचे ठरले आहेत. या महाभागांच्या दौऱ्यांमुळे येथील कुपोषणाचा प्रश्न सुटेल अशी अशा होती परंतु ८ ते ९ ते महिन्याचा कालावधी उलटूनही कुपोषणाचा प्रश्न जैसे थे च आहे. कुपोषण आटोक्यात येण्या ऐवजी कुपोषबळी ठरलेल्या सागर वाघ यांच्या कुटुंबियांच्या घरच्या परिस्थितीचे भीषण वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. आजही या कुटुंबीयांना घरात खायला काहीच नाही. अशा दाहकतेत सीता वाघ यांनी जन्माला घातलेल्या बालकाचे पालन पोषण कसे करायचे? असा प्रश्न ठाकला आहे. महावितरणाने वाघ यांना तातडीने पुरविलेल्या आलेल्या मीटर कनेक्शनचे एका महिन्याचे बिल चार हजाराचे पाठविल्याने ते भरायचे कसे असा प्रश्न आहे विशेष म्हणजे त्यांच्या घरात फक्त एक बल्ब आहे.