शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजशिष्टाचार खुंटीला; महापौरांचे लोटांगण

By admin | Updated: December 24, 2015 01:43 IST

ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी जाहीर केलेले एकही काम मार्गी लागत नसल्याने सध्या राजशिष्टाचार खुंटीला गुंडाळÞून महापौर हे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत.

अजित मांडके, ठाणे ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी जाहीर केलेले एकही काम मार्गी लागत नसल्याने सध्या राजशिष्टाचार खुंटीला गुंडाळÞून महापौर हे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत. आयुक्त महापौरांना चहा पाजून परत पाठवतात आणि त्यांच्या कामाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता शिवसेना स्टाइलने इंगा दाखवण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा महापौरांनी केल्या आहेत.आधीच ठाणे महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर व्हायला आॅक्टोबर उजाडल्याने अंदाजपत्रकातील कामे होत नसल्याची तक्रार आहे. महापौर मोरे यांनी काही प्रकल्पांची व महत्त्वाच्या कामांची घोषणा केली होती. त्यातील एकही योजना सुरू न झाल्याने महापौर कमालीचे अस्वस्थ आहेत. महापौर हे या शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या भेटीला आयुक्तांनी जावे, असा राजशिष्टाचार आहे. परंतु, महापौरांची गंगा उलटी वाहत आहे. आपली कामे मंजूर करवून घेण्याकरिता ते आयुक्त जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते व त्यांना आपला शिवसैनिक असलेला महापौर नोकरशाहीचे असे लांगुलचालन करीत असल्याचे कळले असते तर त्यांनी कठोर शब्दांत महापौरांची कानउघाडणी केली असती, असे मातोश्रीच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. गेल्या काही स्थायी समिती, महासभांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक निधीच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. काही ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डांत कामे केली जात असून इतर नगरसेवकांना मात्र आजही या निधीपासून वंचित राहावे लागत असल्याची काही नगरसेवकांची तक्रार आहे. अशा नाराज नगरसेवकांनी महापौरांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला असता महापौर मोरे यांनी आपली हतबलता त्यांच्या कानांवर घातली. मोरे यांनी ठाणेकरांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रस्ताव पुढे आणले आहेत. विशेष म्हणजे यातील एकही प्रस्ताव अद्याप मार्गी तर लागला नाहीच, शिवाय नगरसेवक निधीच्या मुद्यावरूनही महापौरांचे प्रशासनाबरोबर खटके उडत आहेत. रखडलेल्या प्रस्तावांची यादी महापौरांनी तयार केली आहे. ही यादी घेऊन मोरे आयुक्त जयस्वाल यांना भेटले. मात्र, त्यातून काहीच हाती लागत नाही. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या कामाला केराची टोपली दाखवल्याची भावना महापौरांनी बोलून दाखवली.