शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

ग्रामविकासाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: October 5, 2016 02:12 IST

स्वच्छता, शिक्षण, कला, पर्यावरण आणि पर्यटन या पंचसूत्री कार्यक्र माची नियोजनबद्ध अंमलबजावणी गांधीजयंती दिनी करून चिखले ग्रामस्थांनी ग्रामविकासाची मुहुर्तमेढ रोवली

डहाणू / बोर्डी : स्वच्छता, शिक्षण, कला, पर्यावरण आणि पर्यटन या पंचसूत्री कार्यक्र माची नियोजनबद्ध अंमलबजावणी गांधीजयंती दिनी करून चिखले ग्रामस्थांनी ग्रामविकासाची मुहुर्तमेढ रोवली. महात्मा गांधींचे वालुशिल्प आणि रेतीवर रांगोळीने रेखाटलेल्या चित्राने पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थी, महिला, युवक आणि जेष्ठांनी स्वच्छता मोहीम राबवून कृतीशील कार्य केले. दुपारी अडीच वाजता चिखले हनुमान मंदिर येथून आजी-माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी एकत्रित येवून मुख्यरस्ता व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर रिठी समुद्रकिनारी मोठा जनसमुदाय एकवटला होता. तेथे बापूंच्या वाळूशिल्पाला अभिवादन करून चिखले ते वडकती या दीड किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या करिता तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. डहाणू पंचायत समितीचे उपसभापती लतेश राऊत व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अल्पोपहार दिला. केंद्रशाळा चिखले, विजयवाडी, खाडीपाडा येथे स्वच्छता केली. केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान, तटरक्षक दलाची किनारा स्वच्छता मोहीम, मेरीटाइम बोर्डचे निर्मल सागरतट अभियान या धर्तीवर गांधीजयंती दिनी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व स्वच्छता मोहीम राबविल्याचा लौकिक चिखले गावाने जिल्ह्यात प्राप्त केला आहे. गांधीजयंतीच्या दिवशी चिखले गावात बारा तास स्वच्छता मोहीम राबविली गेली. पंकज पाटील, रतीलाल डोंगरे, किरण पाटील, मनीष जोंधळेकर यांनी कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती. (वार्ताहर)