शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्त्याचा ठिय्या

By admin | Updated: April 1, 2017 05:31 IST

माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित

कल्याण : माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी गुरुवारपासून कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकारी जोपर्यंत पूर्णपणे माहिती देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा बर्मन यांनी दिला.अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट वालधुनी नदीत सोडतात. त्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. महापालिकेचा मलनि:सारण प्रकल्प व आनंदनगर औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद होता. तरीही, सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर काय कारवाई केली, त्याचबरोबर गुजरातच्या पर्यावरण सुरक्षा संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या सुनावणीनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात यावी, असा देशव्यापी निकाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी सहा महिन्यांच्या आत केली जावी, असे न्यायालयाने सूचित केले होते. त्यानुसार, काय अंमलबजावणी केली, याचीही माहिती बर्मन यांनी माहितीच्या अधिकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयास विचारली होती. ६ मार्चला माहिती अधिकाराचा अर्ज स्वत: बर्मन यांनी कार्यालयास सादर केला होता. त्यावर, २२ मार्चला माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, त्यांना अर्धवट माहिती दिली गेली. उर्वरित माहितीसाठी त्यांना पुन्हा कार्यालयात प्रत्यक्ष येण्यास सांगितले. ते सोमवारी कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना माहितीच्या अधिकारातील माहितीची फाइल पाहून घ्या. झेरॉक्स मशीन खराब आहे, असे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी) नोटीस कोणाला?प्रदूषणास जबाबदार असलेल्या कोणत्या कारखान्यांना बंदीची नोटीस बजावली आहे, याची माहिती बर्मन यांना हवी होती. हीच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बर्मन यांनी माहिती आताच द्या, अन्यथा कार्यालय सोडणार नाही, असा इशारा देत त्यांनी ठिय्या दिला.