शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

रिपाइंला युतीकडून हव्यात २० जागा

By admin | Updated: January 8, 2017 02:42 IST

शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती होण्याची चिन्हे दिसत नसताना रिपाइंने (आठवले गट) या दोन्ही पक्षांकडे २० जागा मागितल्या आहेत. मात्र, युतीचाच तिढा सुटू

ठाणे : शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती होण्याची चिन्हे दिसत नसताना रिपाइंने (आठवले गट) या दोन्ही पक्षांकडे २० जागा मागितल्या आहेत. मात्र, युतीचाच तिढा सुटू न शकल्याने रिपाइंबरोबर जागावाटपाची चर्चा झालेली नाही. जागावाटपात योग्य सन्मान झाला नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा ठाणे शहर रिपाइंने दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. शिवसेना आणि भाजपाची स्थानिक मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर रिपाइं (आठवले) गटाने ही मागणी केली आहे. मागील निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेबरोबर संधान साधून १० जागा पदरी पाडून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेची साथ सोडून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रिपाइंचे नेते रामदास आठवले सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत. शिवसेनाही भाजपा सरकारमध्ये सामील आहे. त्यामुळे आता भाजपा व शिवसेना या दोघांनी प्रत्येकी १० याप्रमाणे २० जागा सोडाव्या, अशी मागणी आठवले गटाने केली आहे. शिवसेना रिपाइंला फारच कमी जागा देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. शिवसेनेबरोबर टक्कर द्यायची असेल, तर एकेक जागा त्यांच्याकरिता महत्त्वाची आहे. रिपाइंला किती जागा दिल्या जाऊ शकतात, याबाबत सध्या भाजपा काहीच सांगण्यास तयार नाहीत. विधानसभेला भाजपासोबत व मागील ठामपा निवडणुकीत शिवसेनेबरोबर गेलेली रिपाइं आता कुणाबरोबर जाते, कोण तिला जास्त जागा सोडते की, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशी या पक्षाची स्थिती होते, याकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)आम्ही दोघांकडे २० जागांची मागणी आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे आमचा विचार झाला नाही, तर आम्ही स्वबळावरदेखील लढू. - रामभाऊ तायडे, रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष