शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

कोपर खाडीच्या पाण्यापासून रुळांस धोका

By admin | Updated: August 10, 2015 23:07 IST

वाळू माफियांनी बेकायदेशीर रेती उत्खननकरतांना खाडीकिनारेदेखील पोखरल्याने कल्याण तालुक्यातील कोपर खाडीचे पाणी येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रुळांस लागण्याची शक्यता

ठाणे: वाळू माफियांनी बेकायदेशीर रेती उत्खननकरतांना खाडीकिनारेदेखील पोखरल्याने कल्याण तालुक्यातील कोपर खाडीचे पाणी येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रुळांस लागण्याची शक्यता असल्यामुळे लोहमार्ग खचून रेल्वे गाड्या घसरण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.दोन वर्षांआधी रेल्वे रुळांपासून या कोपर खाडीचे पात्र खूप लांब होते. या दरम्यानच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात खारफुटीचे जंगल होते. त्यामुळे रेल्वे मार्गाकडे येणारे खाडीचे पाणी खारफुटीमुळे अडविले जात होते. पण, ती खारफुटी नष्ट करून तेथील रेतीचे ड्रेझरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. यामुळे या परिसरात भरतीचे पाणी पसरून ते रेल्वे रुळांस लागण्याची शक्यता आहे. यामुळे रेल्वे रुळांखालील मातीच्या भरावाची झीज होऊन लोहमार्ग कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यातून कोणत्याही क्षणी रेल्वे वाहतुकीस धोका संभवू शकतो. याकडे ठाणे जिल्हा प्रशासनासह तालुकास्तरीय महसूल विभाग आणि रेल्वे प्रशासनही दुर्लक्ष करीत आहेत. या खाडी परिसरात होत असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर रेती उत्खननास आळा घालण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडून वेळोवेळी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. पण, त्यांना मात्र कधीही आरोपी सापडले नाही. कारवाई केल्याचा गवगवा करून निनावी गुन्हे दाखल करण्याचे काम मात्र या विभागाने आतापर्यंत केलेले आहे. यामुळेच येथे उत्खनन करणाऱ्यांची हिम्मत वाढून कोपर खाडीकिनारा त्यांनी पूर्णपणे पोखरला आहे. पण, त्यांना रेतीमाफिये अद्याप सापडले नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे याला आळा घातला गेला नाही तर मोठा अपघात होऊन मध्य रेल्वे प्रदीर्घ काळ ठप्प होण्याची व मोठी मनुष्यहानी घडण्याची देखील शक्यता आहे. (प्रतिनिधी)