शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी विकून ठाण्यात रस्ते

By admin | Updated: August 17, 2016 02:51 IST

शहरातील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी करुन सुद्धा अनेक भागात, पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडत आहेत. यामुळे शहरातील सुमारे २७६ रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटीकरणाचा निर्णय

अजित मांडके,  ठाणे शहरातील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी करुन सुद्धा अनेक भागात, पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडत आहेत. यामुळे शहरातील सुमारे २७६ रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी शहरातील पडीक जमीनी, टीडीआर विकून, कर्ज काढून आणि राज्य शानाकडून यासाठी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमासाठी निधी श्रीमंत म्हणवणारी ठाणे महापालिका उभारणार आहे. यासाठी अंदाजे ५५० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. यामुळे महापालिकेचा श्रीमंतीचा दावा खरा की खोटा याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याशिवाय शहरात सामाजिक सुविधा भूखंडासह मैदानांची वाणवा असताना अशा पद्धतीने मोकळ्या जमिनी विकण्याचा निर्णयही प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची भीती असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि विरोधक यावर काय भूमिका घेतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३५६ किमीचे रस्ते असून त्यापैकी आतापर्यंत १०३ किमीचे रस्ते हे यूटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात १०.२७ किमीच्या रस्त्यांना मंजुरी दिलेली आहे. तर उर्वरित २४२.६७ किमीचे रस्ते हे डांबरीकरणाचे आहेत. रस्त्यांवर वांरवांर पडणाऱ्या खडड््यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कायापालट केला जाणार आहे.ठाणे महापालिका हद्दीतील ४.५ किमी ते १५ किमीचे रस्ते हे यूटीडब्ल्युटी पद्धतीने आणि १५ किमीचे रस्ते हे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. यासाठी पालिका स्वत: १२५ कोटी, राज्य शासनाकडून १२५ कोटी, स्फॉट लोनच्या माध्यमातून १२५ कोटी आणि पालिका हद्दीतील जमिनीचे पैशात रुपांतर करुन म्हणजेच जमीनी विकून त्या माध्यमातून १२५ कोटी रुपये उभे करणार आहे.