शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रचारकांसह ‘रोड शो’चा धुरळा

By admin | Updated: February 14, 2017 02:42 IST

युती तुटली आणि आघाडी झाली असे जरी चित्र ठाण्यात असून येत्या काही दिवसात प्रचार सभांचा धुराळा ठाण्यात उडण्यास सुरुवात होणार आहे.

ठाणे : युती तुटली आणि आघाडी झाली असे जरी चित्र ठाण्यात असून येत्या काही दिवसात प्रचार सभांचा धुराळा ठाण्यात उडण्यास सुरुवात होणार आहे. सेंट्रल मैदानात यापुढे सभा घेण्यात येणार नसल्याने विविध राजकीय पक्षांनी गावदेवी मैदान, शिवाजी आणि हायलॅन्ड गार्डन मैदांनाना प्राधान्य दिले आहे. या मैदांनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मनेसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रचार सभा आणि रोड शो ठाण्यात होणार आहेत.सेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी असली तरी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. मनसेने यापूर्वीच एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता प्रचार आणि रोड शो साठी ठाण्यात डेरेदाखल होणार आहे. ठाण्यासह राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळेस लागल्याने आवडत्या नेत्याला ठाण्यात आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनजंय मुंडे यांच्या सभा होणार आहेत. सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक सभा, आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. तसेच शहरातील इतर जिल्ह्यातील राहणाऱ्या मतदारांचा विचार करुन उत्तर महाराष्ट्राचे गुलाबराव पाटील, कोकणातील दीपक केसरकर, राजन साळवी, भरतशेठ गोगावले, मराठवाड्यातील चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, नितीन बानुगडे पाटील आदी नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरविले जाणार आहे. तर भाजपकडून केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा निश्चित आहेत. (प्रतिनिधी)