शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणाला वाढता विरोध

By admin | Updated: May 22, 2017 02:01 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गोखले रोडसह अन्य पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय आयत्यावेळेस

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गोखले रोडसह अन्य पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय आयत्यावेळेस आणून मंजूर करणे, म्हणजे एकप्रकारे त्यांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या रस्ता रुंदीकरणाला आमचा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे. वेळ पडल्यास आयुक्तांविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी नौपाडा परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.पालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या क ाळात शहरात रस्ता रूंदीकरण झाले होते. त्यावेळी नौपाडा रोड परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले. त्यामुळे आता या परिसरात जुन्या शहरातील ६५ टक्के बांधकाम उरले आहे. त्यात आता काय तोडणार? असा सवाल त्यांनी केला. त्यातच पुन्हा रूंदीकरणाचा विषय आयुक्तांनी आयत्या वेळेस आणून मनमानी कारभार सुरू केला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध राहणार आहे. तसेच याबाबत लवकरच नौपाड्यातील व्यापारी एकत्र येऊन बैठक घेणार आहेत. मध्यंतरी रस्ता रूंदीकरणाचा विषय रद्द केला होता. त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी रूंदीकरण होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांचीही या विषयाबाबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले. आयुक्तांनी अचानक हाती घेतलेल्या मुद्दयासंदर्भात काय निर्णय झाला आहे, त्याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे एमसीएचआयचे माजी अध्यक्ष मुकेश चावला यांनी सांगितले. त्यानंतर रस्ता रूंदीकरणाबाबत भूमिका मांडता येईल, असे ते म्हणाले. पण, रुंदीकरणाच्या नावाखाली बांधकामे तुटणार असतील, तर त्याला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.