शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रिक्षाची दुभाजकाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाची दुभाजकाला धडक बसल्याने रिक्षा चालकासह रिक्षातील रेहमत शेख (५७) आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाची दुभाजकाला धडक बसल्याने रिक्षा चालकासह रिक्षातील रेहमत शेख (५७) आणि यास्मीन (३१) हे जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलुंड येथील रेहमत आणि यास्मीन हे मुलुंड येथून राबोडीकडे ८ सप्टेंबरच्या रात्री ८.४५ च्या सुमारास जात होते. त्याचवेळी रिक्षाचालकाचा वेग जास्त असल्याने दोघांनी रिक्षा सावकाश चालवा, असेही या चालकाला बजावले. तरीही त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत रिक्षा भरधाव नेली. रिक्षा तीन पेट्रोलपंप येथे आली असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाची दुभाजकाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा उलटल्याने रेहमत आणि यास्मीन हे दोघेही रिक्षातून खाली पडल्याने जखमी झाले. यात रिक्षा चालकही जखमी झाला. मात्र, त्याने तिथून पलायन केले. जखमींना स्थानिकांनी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, याप्रकरणी ९ सप्टेंबरला नौपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

--------------------