शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकांची मुजोरी सुरुच, वाहतूक पोलिसाला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 19:08 IST

रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणो उभी करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली आहे. मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत.

कल्याण, दि. 11 - रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणो उभी करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली आहे. मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत. पोलिसांनी  रिक्षा चालक कारंडे याला अटक केली आहे. या प्रकारामुळे रिक्षा चालकांची मुजोरी व बेशिस्तपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.शहराच्या पश्चिम भागातील मोहिंदरसिंग काबूलसिंग या शाळेसमोर दोन रिक्षा चालकांनी बेशिस्तपणे रिक्षा रस्त्याच्या मध्ये उभी केली होती. वाहतूक अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिस हिमगिरे व वाहतूक नियंत्रणास मदत करणारा ट्रॅफिक वॉर्डन अक्षय उगले हे त्याठिकाणी कर्तव्य बजावित होते. यावेळी रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिमगिरे यांनी त्यांचे पावती पुस्तक उघडले. तेव्हा रिक्षा चालकाने त्यांच्या अंगावर दोनशे रुपये फेकून दिले. त्यांची कॉलर धरली आणि मारहाण केली. हा प्रकार दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी कारंडे याला अटक केली आहे. अन्य रिक्षा चालक ठाकूर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार कोणी तरी मोबाईलमध्ये कैद करुन त्याची क्लीप वायरल केली आहे. या क्लीपमध्ये पोलिसही रिक्षा चालकाच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून येत आहे असा आरोप रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोणी कोणाला मारले याविषयी रिक्षा चालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.