शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

निवडणुकीत रिचवली १०.७४ लाख लीटर व्हिस्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:05 IST

बीअरची विक्री ९७६४ लीटरने घटली, अमली पदार्थांची मागणी वाढली

सुरेश लोखंडेठाणे : उन्हाच्या दाहकतेपासून काहीअंशी बचाव व्हावा, यासाठी चिल्ड बीअरला मोठ्या प्रमाणात पसंती असते. मात्र, यंदा उलटेच झाले. बीअरऐवजी लोकांनी व्हिस्कीला अधिक पसंती दिली. निवडणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणाची भर पडल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात गेल्या एका महिन्यातच १० लाख ७३ हजार ९५ लीटर व्हिस्कीची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १२ हजार ६५४ लीटरने वाढ झाली आहे. या एका महिन्यात १७ लाख २७ हजार २१५ लीटर बीअर ठाणेकरांनी रिचवली आहे. मागील वर्षापेक्षा नऊ हजार ७६४ लीटरने तिची विक्री कमी झाली आहे.

उन्हामुळे अवघा महाराष्ट्र व ठाणे जिल्हा होरपळून निघत आहे. या जीवघेण्या तापमानात व्हिस्कीऐवजी बीअरला पसंती मिळणे क्रमप्राप्त होते. पण, तसे न होता उलट झाले. उन्हाची तमा न बाळगता निवडणूक प्रचाराच्या या धामधुमीत बीअर पिणाऱ्यांनी व्हिस्कीला पसंती दिली आणि १२ हजार ६५४ लीटर व्हिस्कीच्या विक्रीत वाढ झाली.एवढेच नव्हे तर कण्ट्री दारूच्या विक्रीतही वाढ झाली आहे. ३२ हजार लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारूची विक्री झाली आहे. त्यातुलनेत मागील वर्षी ३१ हजार ९०० लीटर कण्ट्री दारूची विक्री झाली होती. यास अनुसरून १०० लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारू विकल्या गेल्याचे आढळून आले आहे. या पाहणीसाठी ११ मार्च ते २५ एप्रिलपर्यंतच्या या कालावधीची तुलना मागील वर्षाच्या विक्रीशी करून हा अहवाल केला आहे.

5.37 कोटींचे अमली पदार्थ जप्तठाणे लोकसभेसह कल्याण, भिवंडी या मतदारसंघांतूनदेखील ३३ लाख ६५ हजार ६६ लीटर अवैध दारू जप्त झाली आहे. यामध्ये हातभट्टीसह कण्ट्री दारू, व्हिस्की, बीअर, ताडी आणि मोहाच्या फुलांची आदी ४० लाख ६९ लाख ६५४ रुपये किमतीची दारू जप्त केलेली आहे.

७९ हजार ४४३ मि. गॅ्रम अमली पदार्थही या काळात जप्त झाले आहे. यांची किंमत सुमारे पाच कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीच्या या प्रचार कालावधीत निवडणूक यंत्रणेसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणी अहवालासह पोलिसांनी कारवाई करून जिल्ह्यातील अवैध दारूसाठा उघडकीस केला आहे.

टॅग्स :thaneठाणे