शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्राणवायू तुटवड्यावर ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ ठरणार संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:06 IST

संजय केळकर यांच्याकडून रुग्णालयांना यंत्रखरेदीसाठी उपलब्ध केला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे.या परिस्थितीत हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला ते नाकावाटे पुरवणारी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे संजीवनी ठरत आहेत. ही यंत्रे ठाण्यातील कोविड रुग्णांसाठी मिळावीत यासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी आमदार निधी दिला आहे. या यंत्रांमुळे शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.सध्या राज्यासह ठाणे शहरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे खरेदीसाठी ३० लाखांचा आमदार निधी दिला आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा, व्होल्टास, ग्लोबल यांसारख्या कोविड रुग्णालयांत शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना प्राणवायू नसल्याने दाखल करून घेतले जात नाही. प्रसंगी रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवले जाते. या ओढाताणीत रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. विजेवर चालणाऱ्या या यंत्राची ४५ हजार ते एक लाखापर्यंत किंमत आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली ते वापरायचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालये नव्या रुग्णांना प्रवेश नाकारत असल्यामुळे जीव टांगणीला लागला हाेता. मात्र, आता ३० टनांच्या ऑक्सिजनची साेय झाल्याने काही प्रमाणात चिंता मिटली आहे.

सिव्हिल रुग्णालयासाठी २० लाखांचा निधीकेळकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास विविध वैद्यकीय सुविधांसाठी २० लाखांचा निधी दिला आहे. या रुग्णालयातही शेकडो कोविड रुग्ण आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी निधी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही समतोल फाउंडेशनच्या सहकार्याने रोज मोफत जेवणाची व्यवस्था रुग्णालयात केल्याची माहितीही केळकर यांनी दिली.

काय आहे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन?कोरोनाबाधित रुग्णाची शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी हाेते. अशावेळी त्याला कृत्रिम ऑक्सिजन नाकावाटे पुरविण्याची गरज असते. हवेत २० ते २१ टक्के ऑक्सिजन असतो. हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे देण्याचे काम हे यंत्र करते. रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन देण्यासाठी या यंत्रात एका नॉबची व्यवस्था असते. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत असताना हे यंत्र रुग्णांचे जीव वाचवू शकते.लिंडेकडून आणखी १५ मेट्रिक टन ऑक्सिजनठाणे : महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील स्वत:च्या प्लान्टमधून १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने येथील ऑक्सिजनचे बेड दोन दिवसात सुरू होणार आहेत. त्यात आता लिंडे कंपनीनेदेखील अतिरिक्त १५ टन ऑक्सिजन देण्यास मंजुरी दिली आहे. हा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. गुरुवारी पुन्हा लिंडे कंपनीने येत्या दोन दिवसांत तो देणार असल्याचे नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या