शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

प्राणवायूसाठीही आरक्षणाची गरज

By admin | Updated: December 22, 2016 06:06 IST

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए रिजन) हद्दीसाठी जाहीर केलेला विकास आराखडा हा राक्षसी असून

मीरा रोड : मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए रिजन) हद्दीसाठी जाहीर केलेला विकास आराखडा हा राक्षसी असून सर्वसामान्य माणूस आणि पर्यावरणास उद्ध्वस्त करणारा असल्याची टीका फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केली. आता प्राणवायू, पर्यावरण तसेच वृक्षांसाठी आरक्षण मागण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या विरोधात लोकशक्तीचे व्यापक आंदोलन उभारण्याचे आवाहन करत उत्तनच्या दर्यामाता चर्चमध्ये झालेल्या जनआक्र ोश सभेत एकमताने एमएमआरडीएच्या पर्यटनावर आधारित विकास आराखड्यासह आता नव्याने घाट घातलेल्या एमएमआर रिजनल आराखड्याविरु द्ध अखेरच्याश्वासापर्यंत लढू, असा निर्धार स्थानिकांनी केला. मुंबईच्या गोराई-मानोरी,भार्इंदरच्या उत्तन-चौक आदी ९ गावांत पर्यटनावर आधारित विकास आरखडा एमएमआरडीएने मंजूर केला आहे. त्याला ग्रामस्थांनी मोठा विरोध चालवला असतानाच आता राज्य शासनाने संपूर्ण एमएमआर रिजनसाठी नवीन आराखडा आणला आहे. यामध्ये गावेच्या गावेतसेच सुरक्षित असलेला हिरवळीचा पट्टादेखील उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती चंद्रशेखर प्रभू यांनी यावेळी दिली. हरित पट्ट्यात थेट अतिघातक केमिकल आदी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना मोकळीक दिली आहे. यामुळे भविष्यात भोपाळ वायुगळतीसारखी भीषण दुर्घटना होण्याची भीती आहे. मोठ्या गगनचुंबी इमारती बांधण्यास मोकळीक असून कॉरिडॉर, मेट्रो व कोस्टल वे च्या नावाखाली बिल्डरांनी मोठी शहरे निर्माण करून अब्जावधी रु पयांचा फायदा पोहोचवण्याचा घाट यात आहे. तर, बिल्डरांना मोठ्या प्रमाणात चटईक्षेत्र उपलब्ध करून देणार आहेत, असे प्रभू म्हणाले. गावागावांत जनजागृती करून १५ जानेवारी ही हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत असल्याने लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवण्याचे आवाहन फादर दिब्रेटो यांनी केले. पुढारी मोठमोठी भाषणे ठोकत असून जनतेला ते गृहीत धरत आहेत. बिल्डर नावाची भयानक जमात राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने देश चालवत असून आता मच्छीमार, शेतकरी, कष्टकरी यांना हद्दपार करण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले. लोकांना आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत तरु णांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मच्छीमार, शेतकरी व स्थानिकांनी एमएमआर व एएमआरडीएच्या आराखड्यांचा जोरदार निषेध करत तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी समीर वर्तक, मनवेल तुस्कानो, मिलन म्हात्रे, जोजफ घोन्साल्विस, लुड्स डिसोझा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)