शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो बंद पडल्याने पुन्हा कळवा खाडीपुलावर कोंडी

By admin | Updated: August 19, 2016 01:46 IST

एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाहनांची संख्या वाढलेली असतांनाच कळवा खाडी पुलावर टेम्पो बंद पडल्याने वाहतूककोंडीत गुरुवारी आणखी भर पडली. हा टेम्पो अर्ध्या

ठाणे : एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाहनांची संख्या वाढलेली असतांनाच कळवा खाडी पुलावर टेम्पो बंद पडल्याने वाहतूककोंडीत गुरुवारी आणखी भर पडली. हा टेम्पो अर्ध्या तासाच्या अवधीत हटविण्यात आला. परंतु, या काळात झालेली कोंडी दूर होण्यासाठी तासभर लागल्यामुळे अनेकांचा या मार्गावर खोळंबा झाला होता. यामुळे आदल्या दिवशी नारळी पौर्णिमेमुळे या भागात वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांनादुसऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशीही बंद पडलेल्या टेम्पोने चांगलाच मनस्ताप दिला.कळवा ते ठाणे जाणाऱ्या मार्गावरील खाडी पुलावर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो अचानक बंद पडला. त्यामुळे झालेल्या कोंडीमुळे कळवा ते नवी मुंबईच्या विटावा प्रवेशद्वारापर्यंत तसेच ठाणे दिशेकडील साकेत आणि दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलापर्यत दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रक्षाबंधन सणामुळे वाहनांची आधीच गर्दी झाली होती. त्यात या टेम्पोमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी वाढली होती. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास तो क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला. ४ वा. नंतर वाहतूक सुरळीत झाली.अशा प्रकारे कळवा, साकेत, कॅडबरी येथील उड्डाणपुलांवर वाहने बंद पडण्याचे प्रकार घडतात. कधी टायर बस्ट होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. कळवा आणि कापूरबावडीनाक्यावर त्यासाठी वाहतूक शाखेने २४ तास क्रेन्स ठेवल्या आहेत. असे वाहन बंद पडल्यानंतर ते तिथून हटविण्यापर्यत १५ ते २० मिनिटे जातात. ते हटविण्यापर्यंत ही कोंडी राहते. गुरुवारी झालेली कोंडीही वाहतूक पोलिसांनी काही काळातच दूर केली.- संदीप पालवे, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर