शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

कचरामुक्तीपासून केडीएमसी दूरच

By admin | Updated: May 7, 2017 06:01 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट हे केडीएमसीपुढे एक मोठे आव्हानच आहे

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट हे केडीएमसीपुढे एक मोठे आव्हानच आहे. केडीएमसीच्या १२२ प्रभागांमधून ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येकी दोन गाड्या याप्रमाणे २४४ गाड्या लागणार आहेत. सध्याच्या उपलब्ध आणि नव्याने येऊ घातलेल्या अशा २०२ घंटागाड्या आणि आरसी गाड्या महापालिकेकडे असणार आहेत. दुसरीकडे घनकचरा विभागातील जेमतेम एक हजार कामगार कामावर येत आहेत. तसेच आणखी ८०० कामगारांची गरज आहे. यामुळे महापालिकेचा अस्थापना खर्च वाढत असल्याने कचराकोंडी सुटणे कठीण असल्याची बाब शनिवारी स्थायी समितीच्या सभेत समोर आली. परिणामी, सदस्यांनी शहराच्या अस्वच्छतेचा पंचनामा करत प्रशासनाला धारेवर धरले.महापालिका दररोज ओला कचरा, तर आठवड्यातून दोनदा सुका कचरा गोळा करणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे सध्या ११९ घंटागाड्या असून ११ गाड्या येणार आहेत. तर, ५६ आरसी गाड्या असून १६ गाड्यांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या २०२ गाड्या महापालिकेकडे असणार आहेत. अर्थसंकल्पात प्रत्येक प्रभागासाठी एक घंटागाडी आणि कचरापेट्यांसाठी १० लाखांची तरतूद असली, तरी ते प्रत्यक्षात मिळण्यास आणखी वेळ लागणार आहे. महापालिका १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करणार असली, तरी त्यासाठी ओला कचरा मिळणे कठीण आहे.शहर स्वच्छतेबाबतीत कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक घसरल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर तोंडसुख घेत निष्क्रियतेचा आरोप केला. नियोजनपूर्वक अहवाल जोपर्यंत सादर केला जात नाही, तोपर्यंत सभा चालणार नाही, असा पवित्रा घेत सभापती रमेश म्हात्रे यांनी निषेधार्थ सभा तहकूब केली.भाजपाचे सदस्य राहुल दामले यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून सभा तहकूब करावी, अशी प्रस्ताव सूचना मांडली. यावर झालेल्या चर्चेच्या वेळी सर्वच सदस्यांनी प्रशासनावर यथेच्छ टीका केली. यात अधिकारी हप्तेखोर असल्याने कचराप्रकरणी कोणतीही ठोस कृती होत नाही, असा गंभीर आरोप सभापती म्हात्रे यांनी केला. अधिकाऱ्यांची कामे करण्याची मानसिकता नसेल, तर त्यांना हाकलून द्या, असेही त्यांनी सुनावले. सर्वाेच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०१५ ला कचऱ्याच्या मुद्यावर बांधकामबंदी घातली. ती वर्षभराच्या कालावधीनंतर उठवली गेली. या बांधकामबंदीच्या घटनेला आजमितीला दोन वर्षांचा कालावधी उलटला असताना प्रशासनाने कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काय कार्यवाही केली, असा सवालही म्हात्रे यांनी केला. कचऱ्यातून खुराक मिळत असल्याने नियोजनपूर्वक कामे होत नाहीत, असाही आरोप त्यांनी या वेळी केला. प्रशासन केवळ आकड्यांचा खेळ खेळत असून दिशाभूल करत आहे. सकाळी हजेरीशेडवर सफाई कामगार दिसून येतो, परंतु ९ वाजल्यानंतर मात्र तो गायब होतो, यावर देखरेख करण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांची आहे. मात्र, हप्ते बांधले जात असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. सफाई कामगार हे अन्यत्र विभागात पाठवल्याने शहर स्वच्छतेला मनुष्यबळ अपुरे पडते, ही कमतरता पाहता त्यांना मूळ पदावर आणा, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या २०७४ कामगार आहेत. परंतु, यातील १ हजार कामगार उपलब्ध होत आहेत. उर्वरित हप्ते देऊन घरी आराम करत असल्याकडे सदस्य मोहन उगले यांनी लक्ष वेधले. बायोगॅस प्रकल्पाची यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईलएकीकडे प्रशासनाच्या कारभारावर झोड उठवली जात असताना सभापती म्हात्रे यांनी आजवर कोणती कार्यवाही केली, असा सवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना केला. त्यावर तोरस्कर यांनी बांधकामबंदी उठवल्यानंतर न्यायालयात दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर केला जात असल्याची माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापनेचा कृती आराखडा सादर केला असून तीन ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी उभारणे तसेच १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणे आदी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.बायोगॅस प्रकल्पाचे काम सहा ठिकाणी सुरू असून लवकरच दोन प्रकल्प सुरू होतील, असा दावा त्यांनी केला. प्रत्येक प्रभागाला दोन घंटागाड्यांची गरज असून आणखी ८०० कामगारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, यामुळे आस्थापना खर्च वाढत असल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.