शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओ,बच्चो मरो हेच सरकारचे नवे धोरण - विवेक पंडित

By admin | Updated: September 14, 2016 13:48 IST

आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. १४ - आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असताना हे सरकार मात्र स्मार्ट आणि डिजिटल इंडिया सारखे उपक्रम प्राध्यान्य कामावर घेऊन भांडवलदारांचे हिताचे बनले आहे. 
नुकताच रिलायन्स जिओ (JIO) च्या जाहिरतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो प्रसिद्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. नुकताच राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांच्या गावातच एका कुपोषित मुलीचा मृत्यू झाला. रिलायंस जिओ(JIO) और बच्चो मरो असेच सरकारचे धोरण असल्याची सडेतोड टीका विवेक पंडित यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे सत्र अजूनही थांबलेले नाही. मोखाड्यातील सागर वाघ  आणि ईश्वर सवरा यांच्या  मृत्यूची दुर्दैवी घटना ताजी असतानाच नंतर नुकताच वाडा शहरानाजीक  पेठरंजणी या पाड्यात राहणाऱ्या एक मुलीचा कुपोषणाने दुर्दैवी अंत झाला. 
विशेष म्हणजे याच वाडा शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निवासस्थान आहे. या वर्षभरात पालघर जिल्ह्यात 600 बालमृत्यू झाले आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक बालमृत्यू हे सवरा यांच्या मतदारसंघातील आहेत. याबाबत वारंवार आंदोलन आणि मागण्या होऊनही सवरा यांनी कानावर हात दिले आहेत. 
आता सावरा यांच्याकडून जनतेच्या कोणत्याही  अपेक्षा उरल्या नसल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषणाच्या भयाण वास्तवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रत्यक्ष कल्पना देऊनही त्यांच्याकडूनहि अपेक्षाभंग झाल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली. 
 हे सरकार भांडवलदारधार्जिणे झाले असून  गरिबांच्या वेदनेच्या संवेदना या सरकार मध्ये शिल्लक नसल्याचा आरोप पंडित यांनी  केला.  पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले असून अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले आहे, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक कार्यक्रमाची अजून काही काळ वाट पाहू. त्यानंतरही सरकारच्या संवेदना जागृत झाल्या नाही तर अत्यंत आंदोलनास सुरुवात करू असा इशारा विवेक पंडीत यांनी दिला आहे.