शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

निवांत गप्पा... आणि विश्रांती

By admin | Updated: February 23, 2017 05:57 IST

प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदानाचा ताणही ओसरला. त्यानंतर ठाण्यातील नेत्यांनी

ठाणे : प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदानाचा ताणही ओसरला. त्यानंतर ठाण्यातील नेत्यांनी मतमोजणीपूर्वीचा दिवस कुटुंबासोबत, कार्यकर्त्यांसोबत, प्रसंगी विश्रांती घेत कारणी लावला... नंतरच्या राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीसाठी. क्षणभर विश्रांती घेत ताजेतवाने होण्यासाठी...ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दिवस कुटुंबासोबत घालवला. तशीच स्थिती होती शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची. तेही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वेचण्यात रमले होते. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत त्यांच्याकडून ऊर्जा मिळवली. भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी कुटुंबासोबत रमत टवटवीत होण्याचा आनंद लुटला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या धावपळीतही कोकण गाठले. कुलदेवतेचे दर्शन घेतले आणि पुन्हा संध्याकाळी ठाणे गाठत पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांनीही पक्ष कार्यालयात हजेरी लावत निकालाबद्दल कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. मतमोजणीवळी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेचा अंदाज घेतला. एकनाथ शिंदे यांनीही घरबसल्या बरेच काम केले. पण कुटुंबासोबत निवांतपणा अनुभवला. एरव्ही पहाटेपर्यंत सुरू असलेला त्यांचा दिवस प्रचाराच्या काळात, मतदानाच्या दिवशी उसंत न देणारा होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यही भलतेच खूश होते.प्रचार आणि मतदान जरी संपले असले, तरी निवांतपणा नसतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी सकाळी सर्वप्रथम पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही ताणतणाव असो, पवार यांची भेट घेतल्यानंतर तो बराच कमी होतो. त्यामुळे सकाळीच साहेबांना भेटलो. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या एकंदर राजकीय घडामोडी आणि परिस्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. मध्यावधी निवडणुकांची तयारी करायची का, अशी विचारणा आपण साहेबांना केल्याचेही ते म्हणाले. पण त्यावरील साहेबांचे उत्तर मात्र विचारू नका, असे सांगायलाही ते विसरले नाही. एकीकडे प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची विश्रांती सुरू असताना वेगवेगळ््या पक्षांची कार्यालये दिवसभर तशी निवांतच होती. नेत्यांनीही संध्याकाळी हजेरी लावल्याने बहुतेक कार्यकर्त्यांनी आपलाही दिवस विश्रांतीतच घालवला. त्यानंतर मात्र रंगली ती निकालाबाबतचा अंदाज व्यक्त करण्याची स्पर्धा. मतदानाचे प्रभागनिहाय नेमके आकडे हाती आल्याने कोणत्या परिसरात कोणाला किती जागा मिळतील, याचे आडाखे बांधले जात होते. कोण कुठे गेल्याने कुणाला फायदा होईल, कुणामुले कुणाला तोटा होईल... मतांची गणिते कशी बदलतील याचे अंदाज व्यक्त केले जात होते आणि त्या आधारे ठाण्याचे राजकीय चित्र कसे असेल, याचेही. मुंबईवर ठाण्याची समीकरणे अवलंबून असतील की ठाण्याला स्वतंत्र राजकीय निर्णयाची मुभा मिळेल हाही अर्थातच चर्चेचा प्रमुख विषय होता. (प्रतिनिधी)तयारी मतमोजणीचीप्रत्येक पक्षाच्या कार्यालयात उत्सुकता होती ती निकालाची. मुंबईत आणि ठाण्यात राजकीय चित्र असे असेल याची. निकालानंतरची ठाण्याची समीकरणे कशी असतील, ती मुंबईवर अवलंबून असतील का याचीही चर्चा नेते, कार्यकर्त्यांत रंगली होती.