शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला समितीची होणार पुनर्रचना

By admin | Updated: August 30, 2016 02:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ मध्ये शहरातील ३० सदस्यांची फेरीवाला समिती स्थापन केली होती.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ मध्ये शहरातील ३० सदस्यांची फेरीवाला समिती स्थापन केली होती. मात्र, त्याच्या मंजुरीला नकार देत राज्य सरकारने ३ आॅगस्टला जाहीर केलेल्या धोरणानुसार २० जणांचीच समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे फेरीवाला समितीची पुनर्रचना होणार आहे. त्यात आता ३० ऐवजी २० जणांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरीवाल्यांना रोजगार व्यवसायांतर्गत मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र एकता हॉकर्स या फेरीवाला कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात २००२ मध्ये याचिका दाखल केली. त्यावर, २०१३ मध्ये झालेल्या अंतिम सुनावणीतील आदेशानुसार न्यायालयाने केंद्र सरकारला राष्ट्रीय फेरीवाला विधेयकावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, केंद्र सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला विधेयकाला मान्यता दिली. याप्रमाणे केंद्राने सर्व राज्यांना फेरीवाला धोरण स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे धोरण तयार करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू असतानाच मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील पाच हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ३० जणांची समितीही स्थापन केली. मात्र, त्यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. दरम्यान, महापालिकेने फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईविरोधात स्थानिक फेरीवाला संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने फेरीवाल्यांचे पुरावे तपासून त्यांना पर्यायी जागा द्याव्यात. तत्पूर्वी, त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना महापालिकेला केली. तसेच राज्य सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे प्रशासनाने फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २४ आॅगस्ट २०१५ ला मे. सार आयटी रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीची नियुक्ती केली. या नियुक्तीला मान्यता मिळावी, यासाठी त्याचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी यांच्याकडे पाठवला. त्यावर, संचालनालयाने प्रस्ताव अमान्य करत राज्य सरकारच्या फेरीवाला धोरणानंतरच कार्यवाही करण्याची सूचना महापालिकेला केली. अखेर, ३ आॅगस्टला राज्य सरकारने फेरीवाला धोरण जाहीर केले. त्यामुळे महापालिकेला फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यात ३० जणांची फेरीवाला समिती २० वर आणण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीची समिती बरखास्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील सदस्य मात्र प्रशासनाच्या लगीनघाईवर नाराज झाले आहेत. (प्रतिनिधी)