शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मास्कने घालवली लिपस्टिकची लाली; मेकअपचे प्रमाण झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 23:28 IST

मेकअपचे प्रमाण झाले कमी : कॉस्मेटिक विक्रेते, ब्युटी पार्लर यांचा व्यवसाय बुडाला

स्नेहा पावसकरठाणे: गेल्यावर्षी कोरोना आला आणि मास्क जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला. आपल्या प्रत्येकाच्या जवळपास अर्ध्या चेहऱ्यावर मास्क चढलेला असतो. या मास्कमुळे विशेषत: महिला वर्गाच्या मेकअपवर परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. एखाद्या सण, सोहळ्याशिवाय महिलांचे मेकअप करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच कॉस्मेटिक विक्रेते, ब्युटी पार्लर यांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे.

कुठेही बाहेर जायचे म्हटले की मेकअप, सजणे या महिलांच्या आवडीच्या गोष्टी. मग मेकअप, हेअरस्टाइल या सगळ्या गोष्टी आल्याच. मेकअपमधली प्रत्येक नवीन गोष्ट घेण्याकडे महिलांचा कल असतो; मात्र गेल्या मार्चपासून लॉकडाऊनमुळे बहुतांशजण घरात बसले. ऑफिसचे कामही घरूनच होऊ लागले. त्यात कामानिमित्त बाहेर पडायचे म्हटले तरी चेहरा मास्कने झाकत असल्यामुळे कोणीही मेकअप करण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. याचा परिणाम काॅस्मेटिकच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे.

२४ तास घरात मग पार्लर हवे कशाला?गेल्या वर्षभरात बहुतांश महिला या अधिक वेळ घरातच असतात. कुठे जायचं म्हटलं तरी चेहऱ्यावर मास्क असतो. त्यामुळे कशाला पार्लरमध्ये जाऊन पैसे घालवायचे, मेकअप करून दिसत पण नाही, या विचाराने महिला वर्गाचा मेकअप, ब्युटी पार्लरच्या वस्तूंचा वापर कमी झाला आहे.    - रिषिता साळवी,     ब्युटीपार्लर चालक 

आधीच आम्हाला दुकाने सुरू ठेवायला परवानगी नाही. मध्यंतरीच्या काळात दुकाने उघडत होतो. मात्र तेव्हाही फारसा अपेक्षित व्यवसाय झाला नाही. कारण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा घरूनच कामे होत असल्याने महिला घराबाहेर कमी पडतात. त्यामुळे त्यांचे कॉस्मेटिक खरेदीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गेल्यावर्षीच्या घेतलेल्या वस्तूही विक्री न झाल्याने तशाच आहेत.    - विरेन कामाडी,     कॉस्मेटिक विक्रेते