शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रेंगाळलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:33 IST

मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत असून त्यातील काही पडल्या, तर काही जमीनदोस्त करण्यात आल्या. परंतु, त्यांचा पुनर्विकास राजकीय साठमाºयांमध्ये अडकल्याने शेकडो कुटुंबे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत असून त्यातील काही पडल्या, तर काही जमीनदोस्त करण्यात आल्या. परंतु, त्यांचा पुनर्विकास राजकीय साठमाºयांमध्ये अडकल्याने शेकडो कुटुंबे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न २०१२ मधील ‘लता अपार्टमेंट’ या इमारतीच्या दुर्घटनेमुळे चव्हाट्यावर आला. त्या वेळी धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याची जोरदार मोहीम पालिकेने सुरू केली. केवळ नोटिसा पाठवून कारवाईचा बडगा प्रशासनाकडून उगारला गेला. पालिकेच्या नोटिसांना इमारतींमधील रहिवाशांनी भीक न घालता जीव मुठीत धरून धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्येच वास्तव्य केले. यापूर्वी अशा इमारतींना पालिका दुरुस्तीच्या परवानग्या देऊन त्यांची तात्पुरती देखभाल करत होती. परंतु, २०१२ मधील त्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनात अतिरिक्त एफएसआयचा अडसर ठरू लागला. ३० ते ४० वर्षांपूर्वी इमारती बांधताना विकासकांनी मंजूर एफएसआयसह बेकायदा अतिरिक्त एफएसआयचा वापर केला आहे. त्यामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता अतिरिक्त एफएसआयच शिल्लक नसल्याने विकासकांना त्यामध्ये रस नाही. परिणामी, पुनर्विकास न झालेल्या अनेक इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या. तत्पूर्वी या समस्येवर मार्ग काढण्यासाठी २००९-१० मध्ये प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता इमारतीच्या बांधकामाच्या वेळी वापरण्यात आलेला एफएसआय अधिक १ एफएसआयचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु, तो राज्य सरकारने अद्यापही मंजूर केलेला नाही. यानंतर, धोकादायक इमारतींकरिता सामूहिक विकास योजना सरकारने जाहीर केली. एकापेक्षा अधिक धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची ही योजना अत्यंत क्लिष्ट व तांत्रिक अडचणीची ठरू लागल्याने बहुतांश खाजगी विकासकांनी ती अमान्य केली आहे. शहरातील शेकडो इमारतींमधील रहिवासी पुनर्विकासाच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतानाच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोकादायक इमारतींची वयोमर्यादा ३० ते ३५ वर्षांवरून कमी करून २५ वर्षे केली. परंतु, एफएसआयच शिल्लक नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास न आल्याने केवळ धोकादायक इमारतींचे वय कमी करण्याचे दाखवण्यात आलेले गाजर कितपत प्रभावी ठरणार, हे येत्या पालिका निवडणुकीतील मतदानावरच निर्भर राहणार आहे. शहरात सध्या पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आश्वासनांची खैरात सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, त्यात इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त एफएसआय दिल्याखेरीज प्रश्न सुटणार नाही. तसेच ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या व धोकादायक अवस्थेतील काही इमारती तिवर क्षेत्रात बांधल्याचे २००० मधील पर्यावरणवादी आराखड्यात स्पष्ट झाल्याने त्यांचा विकास तर अशक्यप्राय झाला आहे. अलीकडेच राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला. त्यातही तिवर क्षेत्रातील बांधकामांचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.तिवर क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पर्यावरण विभागाच्या परवानगीने होणार नसल्याने त्यातील रहिवासी छप्पर जाणार, या भीतीने हवालदिल झाले आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना एमएमआरडीएच्या घरकुल योजनेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला. सहाशेहून अधिक घरे मिळाली असली, तरी बहुतांश घरात ‘बीएसयूपी’तील लाभार्थी राहत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवासी वाºयावर आहेत.